JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलली आणि सभेत पिकला मोठा हशा

अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलली आणि सभेत पिकला मोठा हशा

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनावणे, 25 डिसेंबर, पुणे : वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलाच हशा पिकवला. व्यासपीठावर बसताना अजित पवार यांनी शेजारी असलेल्या नावाची पाटी बदलून हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची पाटी शेजारी घेतली आणि त्यांना शेजारी बसवून घेतलं. त्यानंतर समोर बसलेले सभासद हसून-हसून लोटपोट झाले. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीटवाटपावरून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन नेत्यांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. मात्र आजच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी नावाची पाटी बदलून हर्षवर्धन पाटील यांना जवळ बसवले आणि क्षणात हे वातावरण बदलले. सुरुवातीला नावाच्या पाट्या बघून नेते बसत असतानाच अजित पवार पुढे आले आणि त्यांनी नावाच्या पाट्या बघितल्या. त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. ती पाटील अजित पवार यांनी बदलून हर्षवर्धन पाटील यांची पाटी शेजारी घेतली आणि नंतर मागोमाग आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसवून घेतलं. तसंच नंतर त्यांच्याशी गप्पाही मारल्या. संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता. राहुल गांधींचं म्हणणं ऐकून तिने UPSC चा नाद सोडला, 28 व्या वर्षी झाली आमदार दरम्यान, लोकसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर 8 महिन्यांच्यानंतर आज वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या सर्व साधारण सभेच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटले. मोहिते पाटील यांना स्टेजवर पाहताच शरद पवार यांनीही त्यांना जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या