JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! नवी मुंबईत लोकल ट्रेनचा अपघात; नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर रुळांवरून घसरली ट्रेन Video

मोठी बातमी! नवी मुंबईत लोकल ट्रेनचा अपघात; नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर रुळांवरून घसरली ट्रेन Video

आज सकाळी रुळांवरून घसरल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला आहे.

जाहिरात

नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर रुळांवरून घसरली ट्रेन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी: नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेरुळ ते उरण जाणारी लोकल अचानक आज सकाळी रुळांवरून घसरल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नेरुळ-उरण मार्गावर असलेल्या खारकोपर स्थनाकाजवळ ही घटना घडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकलचे तब्बल तीन डब्बे अचानक घसरल्यामुळे बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना सकाळी 9 वाजताची असल्यामुळे नवी मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे नेहमीच्या वाहतुकीवरयाचा परिणाम झाला आहे. काही लोकल गाड्या उशिराने धावत असल्याची शक्यता आहे. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या

‘रेल्वे दल मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झालं आहे. या रेल्वे अपघातामुळे आता बेलापूर-खारकोपर-नेरुळ मार्गावर कोणत्याही लोकल ट्रेन सुरू नाहीत अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या