JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कारने पोहोचले, पंकजा मुंडेंचा खुलासा

...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कारने पोहोचले, पंकजा मुंडेंचा खुलासा

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे कार्यकारणी बैठकीला एकाच गाडीतून आल्याने सर्वाच्या चर्चेचा विषय ठरले होते

जाहिरात

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे कार्यकारणी बैठकीला एकाच गाडीतून आल्याने सर्वाच्या चर्चेचा विषय ठरले होते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

निलेश पवार, प्रतिनिधी नाशिक, 11 फेब्रुवारी : भाजपच्या नेते पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज एकाच कारने एकत्र भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला आल्याचे पाहण्यास मिळाले. एकाच हॉटेलमध्ये आम्ही एकत्र थांबलो होतो, त्यांची गाडी पहिली आली त्यामुळे आम्ही सोबत आलो, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये सुरू झाली आहे. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री हजर आहे. या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे आणि देवेद्र फडणवीस हे एकाच कारने आले. (भाजपचं मिशन 200, आज नाशिकमध्ये ठरणार मेगा प्लॅनिंग) ‘मी आणि देंवेंद्रजी एकाच हॉटेलमध्ये रहायला होतो. त्यांची गाडी लागली होती माझी गाडी मागे होती. त्यामुळेच मी त्यांच्या गाडीत बसtन कार्यकारिणी बैठकीला आले असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. ‘भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी सदस्य म्हणून मी कार्यकारणी बैठकीला उपस्थित होते. भाजपाची जी नियामानुसार कार्यकारणी व्हायला पाहिजे होती. ती बाकी असल्याने ती आता होत आहे. राजकीय प्रस्तावावर चर्चेसोबत आगामी कार्यक्रमांबद्दल चर्चा झाल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं.   (रवीकांत तुपकरांचा गनिमी कावा, पोलीस वेशात येऊन अंगावर ओतलं रॉकेल VIDEO) दरम्यान, आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200 असा नारा आजच्या कार्यकारणीत बैठकीत देणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. शुक्रवारी या बैठकीत लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बिजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोंदणी, डेटा व्यवस्थापन, युवा वॉरीयर्स, सोशल मीडिया आणि त्याचा वापर व विधानसभा प्रवास या विषयांचा आढावा घेण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या