JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rudraksh Mahotsav : रुद्राक्ष महोत्सवाला गेलेल्या मालेगावच्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू

Rudraksh Mahotsav : रुद्राक्ष महोत्सवाला गेलेल्या मालेगावच्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू

यादरम्यान अनेक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात

breaking

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव : महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र या उत्साहाला मध्य प्रदेशातील सिहोर इथे गालबोट लागलं आहे. रुद्राक्ष महोत्सवात मोठी चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की झाली. यादरम्यान अनेक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील सिहोर येथे कुबेरेश्वर धाम मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मालेगावच्या महिलेचा मृत्यू झाला. मंगला कांडेकर असे या महिलेचे नवा आहे. रुद्राक्ष घेण्यासाठी मालेगावातून हजारोच्या संख्येने भाविक गेले आहे कुबेरेश्वर धामला पोहोचले होते.

Rudraksh Mahotsav in Sehore : धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये धक्काबुक्की, बुलडाण्याच्या 3 महिला बेपत्ता

अजूनही रुद्राक्ष महोत्सवासाठी लोक जात आहेत. बुलडाण्याच्या खामगाव इथल्या तीन महिल्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नातेवाईकांनी ही तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणी महिलांचा शोध सुरू आहे. सिहोर इथे रुद्राक्ष महोत्सव सुरू आहे. इथे मोफत रुद्राक्ष वाटले जात आहे. ते घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक इथे पोहोचले आहेत. सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. तर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या