जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rudraksh Mahotsav in Sehore : धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये धक्काबुक्की, बुलडाण्याच्या 3 महिला बेपत्ता

Rudraksh Mahotsav in Sehore : धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये धक्काबुक्की, बुलडाण्याच्या 3 महिला बेपत्ता

Rudraksh Mahotsav in Sehore : धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये धक्काबुक्की, बुलडाण्याच्या 3  महिला बेपत्ता

मध्यप्रदेशच्या सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सवामध्ये गेलेल्या…खामगाव तालुक्यातील 3 महिला बेपत्ता….

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

    प्रतिनिधी राहुल खंदारे बुलडाणा : महाशिवारात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविक जात आहेत. अशाचत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्यप्रदेश येथील सिहोर मध्ये मोफत रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली आहे. सिहोर इथे मोफत रुद्राक्ष वाटप चा कार्यक्रम सुरू आहे त्याठिकाणी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. लाखो भाविक सिहोरला दाखल झाले आहेत त्याठिकाणी लाखोंच्या संख्येत भाविक दाखल झाल्याने काही प्रमाणात चेंगराचेंगरी देखील झाली आहे. सिहोरला बुलडाणा जिल्ह्यातून ही अनेक भाविक गेले आहेत. त्यामधील 3 महिला भाविक बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत तीन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात दिली. सिहोरला गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याने ही तक्रार दाखल केल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. या महिला वाडी, सुटाळा खुर्द इथल्या रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात