नाशिकमध्ये भीषण अपघात
नाशिक, प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ : मुंबई नाशिक महामार्गावर इगतपूरी परिसरात कंटेनरने धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्दैवानं या अपघातात दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना धडक दिली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना हा अपघात झाला. आज पहाटे च्या सुमारास शहापूर मानस मंदिर येथून नाशिक येथे चतुर्मास साठी पायी प्रवास करणाऱ्या सांध्वी पहाटे 5.30 वाजता कसारा बायपास लगत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरून पायी प्रवास करीत होत्या. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरचं नियंत्रण सुटलं त्याने दोन साध्वींना धडक दिली आहे.
ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक, 13 जणांनी गमावला जीवनियंत्रण सुटलेल्या कंटेनरने आधी त्यांच्याजवळ असलेल्या वाहनाला धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरच्या चाका खाली येऊन दोन्ही सांध्वींचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; ड्रायव्हर….अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थली धावं घेऊन टोल प्रशासनाच्या 1033 या रुग्णवाहिकेतून मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले. दरम्यान आपघात करून जाणारा कटेनर चालक कटेनर टाकून पळून गेला असून पुढील तपास कसारा पोलीस करत आहेत.