जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Thane News : धक्कादायक! ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; ड्रायव्हर....

Thane News : धक्कादायक! ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; ड्रायव्हर....

ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Thane News : हा घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. ब्रीजवरुन सळई पडली आणि थेट गाडीचे छत छेदून ड्रायव्हर सीटमध्ये घुसली आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, प्रतिनिधी अजित मांढरे : मेट्रोसाठी अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र आता तर एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मेट्रोचे सुरु असलेल्या कामा दरम्यान ब्रीजवरुन सळई पडली आणि भयंकर प्रकार घडला. ही सळई थेट ब्रीजखालून जाणाऱ्या कारवर पडली. ही सळई उभी पडल्याने कारच्या आरपार घुसली आहे. यावरुन सळई किती धारधार असेल याची कल्पना तुम्ही करु शकता. दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं कार चालकाचा जीव वाचला आहे. ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Train Accident : ओडिशात पुन्हा रेल्वे अपघात, मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले
जाहिरात

हा घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. ब्रीजवरुन सळई पडली आणि थेट गाडीचे छत छेदून ड्रायव्हर सीटमध्ये घुसली आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक पाहात राहिले आणि परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

फक्त 5 सेकंदात पूल कोसळला नदीत, 1700 कोटी पाण्यात; थरारक VIDEO VIRAL
News18लोकमत
News18लोकमत

तिन्हात नाका इथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इको गाडीचं छत छेदून लोखंडी सळई घुसल्याने खळबळ उडाली. याचा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतकडे आला आहे. मेट्रोचे सुरु असलेल्या कामा दरम्यान पडली ही सळई पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात