JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik News : 'दोस्तो की दुनियादारी' तब्बल 36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले शाळेतले मित्र

Nashik News : 'दोस्तो की दुनियादारी' तब्बल 36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले शाळेतले मित्र

तब्बल 36 वर्षांनंतर शाळेतले मित्र एकत्रित आले होते. यावेळी त्यांनी स्नेहसंमेलन साजरे केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 4 मे : शालेय शिक्षण झाल्यानंतर आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. स्वतः चा शोध घ्यायला नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नसते. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो. म्हणूनच नाशिक जवळील घोटी येथील जनता विद्यालय शाळेतील दहावीच्या 1987 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संयोजक निसर्ग दुर्गप्रेमी भगीरथ मराडे यांच्या आग्रहास्तव अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आशिया खंडातील खोल दऱ्यांमध्ये दोन नंबरची असलेली सांधण व्हॅलीत एकत्र येत स्नेहसंमेलन साजरे केले. 36 वर्षांनंतर एकत्र  आजच्या धकाधकीच्या जिवनात कामाच्या व्यापात प्रत्येक जण खूप गुंतलेला असुन स्वतःचा आनंद विसरून गेलेला आहे. परंतु वेळातवेळ काढून घोटी येथील जनता विद्यालय शाळेतील जुने पुराणे मित्र, मैत्रिणी विखुरलेल्या पाखरांप्रमाणे 36 वर्षांनंतर निसर्गाच्या सानिध्यात सांधण व्हॅलीत एकत्र आले.

आठवणींना उजाळा अतिप्राचीन जिओग्राफीक फॉल्ट लाईन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग. यामुळे निर्माण झालेली सर्वात खोल असलेली सांधणदरी हा निसर्गाचा अद्दभूत असा चमत्कार बघत बघत त्यातच शाळेतील अभ्यास, परीक्षा, गुण, व्यायाम, कसरती, खेळ, सराव, सहली इतर सुवर्णक्षणांच्या अविस्मरणीय आठवणींच्या गप्पा मनसोक्त मारत शालेय जीवनातील जुन्या सुवर्णक्षणांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. स्थानिक असलेला गिर्यारोहक जगदीश बांडे यांनी बनविलेल्या गावरान जेवणाचा सर्वांनी स्वाद घेत नैसर्गिक वातावरणात स्नेहसंमेलन साजरे केले. आमचा एक छोटासा प्रयत्न शहरातील फाईव्हस्टार हॉटेल, ढाबे, यांसारख्या ठिकाणी पार्टी न करता तसेच डीजेच्या कर्कश ध्वनिप्रदूषणाला फाटा देत आपली प्राचीन संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अशा निसर्गरम्य वातावरणात प्रत्येकाने स्नेहसंमेलन करावी. या परिसरात पर्यटनांमुळे अनेक व्यवसायाला वृद्धी मिळावी. येथील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा व सर्वच व्यवसायांची वाढ व्हावी या उद्देशाने आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधव समृद्ध होईल, असा संदेश या माजी विद्यार्थ्यांनी दिला.

कोल्हापूरच्या प्रतिकचा नादखुळा, मुलींना सुद्धा लाजवेल केलं असं काम, आता देशभरातून डिमांड

संबंधित बातम्या

अशा अनोख्या शालेय मित्र, मैत्रिणींचे स्नेहसंमेलनात संयोजक तथा गिर्यारोहक भगीरथ मराडे, योगेश सोनवणे, प्रदीप चोरडिया, अॅड. माधुरी गवारी, नीता बागमार, शर्मिला कोतुळकर, राशी धनु, संगीता माहुरकर, राखी चोरडिया, मंजुषा गौड, कविता लव्हाटे, निशा लोढा, ह.भ.प. वासुदेव महाराज दुभाषे, पोलीस उपनिरीक्षक किरण गोसावी, मच्छिंद्र पगारे, किरण अवसरकर, राजेंद्र बागुल, विकास परमार, संजय नागरे, तुळशीराम बबेरवाल, दशरथ आडोळे, आनंद गौड, भेरूलाल शर्मा, धर्मा आव्हाड, शाम घोटकर, बबन लांडगे, तसेच इतर माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या