JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिककरांनो पाणी जपून वापरा, उद्या 'या' कारणामुळं पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिककरांनो पाणी जपून वापरा, उद्या 'या' कारणामुळं पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा महापालिकेनं केली आहे. काय कारण आहे जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 19 मे : नाशिक शहरात उद्या ( शनिवार, 20 मे ) शनिवार संपूर्णतः पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आज आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. त्यासोबतच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. का घेतला निर्णय? मनपाच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून 33 के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करण्याकरीता विज वितरण कंपनीमार्फत (शनिवार 20 मे) रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही.

तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलशुध्दीकरण केंद्र आणि जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. मनपाचे गंगापुर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा (शनिवार 20) मे रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही.

वॉशिंग मशिनमधलं पाणी फेकू नका, परत येणार वापरता! पाहा हे खास उपकरण, VIDEO

संबंधित बातम्या

तसेच रविवार 21 मे रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी आणि मनपास सहकार्य करावे, असं  आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या