अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 19 मे : धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ कमी असतो. त्यामुळे हल्ली कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर जवळपास प्रत्येक घरात दिसून येते. मात्र, कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशिनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यामुळे मंगळवेढा येथील नवसंशोधक वैभव मोडक यांनी टाकाऊ ‘पाण्याचा पुर्नरवापर’ म्हणजे ‘रिसायकलिंग ऑफ वॉटर’ या संकल्पनेअंतर्गत वॉशिंग मशिनमधून निघणाऱ्या पाण्याचा पुर्नरवापर करण्याचे उपकरण त्यांनी विकसित केले आहे. कसा होणार पाण्याचा उपयोग? वॉशिंग मशिनमधून मोठ्या प्रमाणावर निघणारे पाणी जे पुढे टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरता येईल हेच ते मॉडेल त्यांनी बनविले आहे. भविष्यात ‘इको फ्रेंडली लाइफ स्टाईल’साठी त्यांची संकल्पना महत्त्वाची बनली आहे. लवकरच हे उपकरण बाजारात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी या संशोधनाचे पेटंट करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या सर्व कामांसाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘उद्यम इंक्यूबॅशन’केंद्राचे मार्गदर्शन लाभत आहे.
पाणी बचत करु शकता सर्वसाधारणपणे वॉशिंग मशिनमधील कपडे धुतलेले पाणी ड्रेनेज किंवा सांडपाणी म्हणून सोडून दिले जाते. प्रत्यक्षात या पाण्यात कोणतेही घातक असे पदार्थ नसतात. हार्वेस्टींग या संकल्पनेच्या बरोबरीने रियुज ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचा पुर्नरवापर ही संकल्पना त्यांनी समोर आणली आहे. शहरी जीवनशैली किंवा फ्लॅट संस्कृतीत जागेची कमतरता असल्याने त्याचा विचार करून त्यांनी या उपकरणाचा आकार कमीत कमी ठेवण्याचे प्रयत्न केले. दररोज कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी वॉशिंग मशिनच्या पाइपमधून एखाद्या बादलीत गोळा केले जाते. छोट्या मोटारने ते प्रक्रिया युनिटमध्ये ते पाणी सोडले जाते. तेथे हे पाणी तुरटीने स्वच्छ करून शौचालयामध्ये स्वच्छतेसाठी म्हणजे टॉयलेट फ्लशिंग साठी जोडता येते. या संशोधनाची नोंद त्यांनी पेटंटसाठी करण्याचे ठरविले आहे. नजीकच्या काळात या उपकरणाचा वापर करुन गृहनिर्माण संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती या संस्था कोट्यवधी रुपयांची पाणी बचत करु शकतात. या संशोधनात्मक उपकरणाचे मोठे सकारात्मक परिणाम उमटणार आहेत, असं नवसंशोधक वैभव मोडक यांनी सांगितले.
टाटांच्या गाड्यांना आता मराठी माणसाने बनवलेला लागणार पार्ट, तब्बल 13 कोटींना घेतलं पेटंट!
पाणी पुनर्वापर उपकरणाबद्दल -वॉशिंग मशिनमधून बाहेर पडलेल्या पाण्याचा होणे शंभर टक्के पुनर्वापर. -अल्प खर्चात वॉशिंग मशिनमधून निघणाऱ्या संपूर्ण-पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य. -अत्यल्प खर्चात उपकरणाची उभारणी. -अत्यल्प जागेत उभारणी होणार शक्य. -वॉशिंग मशिनचे पाणी टॉयलेट फ्लशिंगसाठी उपयुक्त. -उपकरणाची पेटंट नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु. -इकोफ्रेंडली हाउसिंग टेक्नॉलॉजीत पडणार नव्याने भर.