विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 22 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही कांदा बाजारपेठ सर्वांनाच परिचित आहे. या ठिकाणाहून कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. मात्र, आता आंबा देखील लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या माध्यमातून निर्यात केला जात आहे. कोकणातील हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झाली आहे. किती टन झाली निर्यात? कोकणातील हापूस आंबा हा सर्वांनाच भुरळ पाडत असतो. वैशिष्ट्यपूर्ण चवीने तर अवघ्या जगावर अधिराज्य गाजवले आहे. अमेरिकेतील नागरिकांना हापूस आंब्याची भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस, केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन जवळपास 70 ते 75 टन आंबे 20 हजार पेटीतून अमेरिकेकडे निर्यात झाले आहेत.
आंबा देखील निर्यात लासलगाव ही कांदा बाजारपेठ सर्वांनाच परिचित आहे. या ठिकाणाहून कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. मात्र, आता आंबा देखील भाभा अणु संशोधन केंद्राच्या माध्यमातून निर्यात केला जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी त्यावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते. त्यानंतर निर्यात होते असते. गेल्या वर्षी जवळपास 350 मेट्रिक टन आंबा लासलगाव येथे प्रक्रिया करून विदेशात पाठवला होता. यावर्षी तब्बल 500 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्याचे उदिष्ट समोर ठेवण्यात आले असल्याची माहिती भाभा अणु संशोधन केंद्राचे अधिकारी संजय आहेर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनो, पुढील काही दिवस जपून… वाढत्या तापमानाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा सल्ला! Video
या वर्षी आंब्याच्या उत्पादनात घट विशेष म्हणजे दरवर्षी कोकणात आंब्याच उत्पादन हे चांगल्या प्रकारे होत असते. मात्र, या वर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ नुकसान झालं. मध्येच अवकाळी पाऊस झाला त्यामुळे ही नुकसान झालं. वातावरणातील सततच्या बदलामुळे अंब्याना मोहर लवकर आला नाही, अशी स्थानिकांची माहिती आहे. त्यामुळे उत्पादन मोठी घट झाली आहे.