विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 13 एप्रिल : अचानक पडलेला तुफान पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड या तालुक्यात शेत पिकांसह घराचं मोठ नुकसान केलं आहे. पेठ तालुक्यातील सारस्ते,आमलोण,अभेटी,ससुने, कुळवंडी,बर्डापाडा, गावंध,नाचलोंढी परिसरात मेघगर्जनेसह झालेल्या गारांच्या पावसाने पाळीव जनावरांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहे.घरांचे पत्रे,आंबा,काकडी,जनावरांचा चारा पिकासह घरांच्या भिंतींचं नुकसान झालंय. अनेक कुटुंब उघड्यावर हरसूल जवळील सारस्ते सहआमलोण परिसरात गारपीट झाली.पावसाचा वेग आणि गारांचा तडाखा अतिशय जोरात असल्याने पाळीव जनावरांच्या पाठीवर जखमा झाल्या, घराचे पत्रे ही फुटले आहेत.वाऱ्याच्या वेगाबरोबरच गारांचा वेग तितकाच जोरदार असल्याने अनेक कुटुंबे नुकसानबाधित होऊन उघड्यावर पडली आहेत.
या पावसाने अनेक घरांचे छत हरवले आहे.यामुळे अनेक गाव पाडे या जोरदार अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान बाधित झाले आहेत.आमलोण येथील माजी सरपंच प्रकाश भोये यांच्या घरासह शंभरहून अधिक घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे.याच शिवारातील देवकीबाई हिरामण गायकवाड यांच्या घरावरील 112 सिमेंट पत्र्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अभेटी येथील शेतकरी नामदेव लहानु सहारे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी बसविलेल्या सोलरची मोठी दुरवस्था झाली आहे. तर आंबा,काकडी पिकासह जनावरांचा चाराही भिजलाय. कर्ज काढून पोल्ट्री फार्म उभारला पण.. पेठ तालुक्यातील मंगेश इम्पाळ या शेतकऱ्याने कर्ज काढून पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू केला होता.काही दिवस या व्यवसायाला झाले होते.त्यामध्ये कोंबड्या देखील त्यांनी भरलेल्या होत्या, मात्र क्षणात होत्याच नव्हत झाल, पावसामुळे हा पोल्ट्री शेड पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्याबरोबरच मंगेश यांचं घराचं ही मोठं नुकसान झालंय त्याचा संसार पूर्णतः उघड्यावर आला आहे. त्यामुळे आता मायबाप सरकार तरी आम्हाला मदत करेल का अशी विनवणी मंगेशनं केलीय. पुण्यासह मुंबई उपनगरात पाऊस धुमाकूळ घालणार, उन्हाच्या झळा असह्य द्राक्ष बागांनाही फटका दिंडोरी निफाड तालुक्यात द्राक्ष बागांचे मोठं नुकसन झाल आहे. ऐन भरात द्राक्ष काढलेला असताना अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षांचं नुकसान झालंय अनेक बागा भुईसपाट झाल्या आहेत. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपानं हिरावून घेतलाय. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे आता त्यांच्याकडे काहीही उरलेलं नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून भरपाई त्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आणि या संदर्भात राज्य सरकारने देखील पाउल उचलली आहेत. अनेक भागात पंचनामे सुरू झाले आहेत. त्यामुळे आता मदत कधी मिळणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.