जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यासह मुंबई उपनगरात पाऊस धुमाकूळ घालणार, उन्हाच्या झळा असह्य

पुण्यासह मुंबई उपनगरात पाऊस धुमाकूळ घालणार, उन्हाच्या झळा असह्य

पुण्यासह मुंबई उपनगरात पाऊस धुमाकूळ घालणार, उन्हाच्या झळा असह्य

उन्हाच्या झळांसोबत राज्यात पावसाचे सावट असल्याने पुढचे काही दिवस पावसाची शक्यता आहे.

  • -MIN READ maharashtra
  • Last Updated :

पुणे, 13 एप्रिल : राज्यात मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. उन्हाच्या झळांसोबत राज्यात पावसाचे सावट असल्याने पुढचे काही दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यात पारा वाढत असल्याने चंद्रपूर 41.8, जळगाव 41.6, ब्रह्मपुरी 41.0, वर्धा 40.9, सोलापूर 40.6, परभणी 40.2, धुळे 40 याजिल्ह्यात उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. याचबरोर वादळी पाऊस आणि गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जाहिरात

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर  मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. आज (ता. 13) मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात वादळी पावसासह गारपीट, तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बापरे! कडाक्याचे उन्हाचे असेही परिणाम, रातोरात रिकामं झालं अख्खं गाव, काय घडलं?

राज्यात मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, ब्रह्मपुरी येथे तापमान 41 अंशांपेक्षा अधिक होते. तर वर्धा, सोलापूर, परभणी, धुळे येथे पारा 40 अंशांपार पोचला होता. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून 35 ते 39 अंशांच्या दरम्यान होते.

राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 38.6 (20.2), जळगाव 41.6 (26.8), धुळे 40.0 (20.4), कोल्हापूर 37.5 (23.7), महाबळेश्वर 31.1 (19.0), नाशिक 38.5 (20.0), निफाड 38.1(19.0), सांगली 37.9 (23.6), सातारा 38.1 (21.0), सोलापूर 40.6 (23.4), सांताक्रूझ 36.2 (25.8), डहाणू 34.0 (24.7), रत्नागिरी 32.5 (24.6), छत्रपती संभाजीनगर 38.1 (20.7), नांदेड 38.4 (25.4).

जाहिरात

परभणी 40.2 (24.5), अकोला 39.9 (23.3), अमरावती 39.6(23.7), बुलडाणा 39.2 (23.4), ब्रह्मपुरी 41.0 (24.8), चंद्रपूर 41.8 (24.6), गडचिरोली 36.4(22.4), गोंदिया 39.0 (22.2), नागपूर 39.0 (24.0), वर्धा 40.9(24.2), वाशीम 37.6 (24.2), यवतमाळ 39.5 (24.0).

सोलापुरातील उन्हाचा पारा 42 अंशावर

सोलापूर शहरात तापमानाचा पारा वाढत आहे. रोजच सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. बुधवारी यावर्षीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात दररोज वाढ होत आहे. सूर्य आग ओकत असल्याने बुधवारी सोलापूर चांगलेच तापले. शहराचा पारा 41.6 अंशांवर गेल्याने वाढत्या उष्म्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत.

जाहिरात
पुणे जिल्ह्यात एप्रिलमध्येच रेकॉर्डब्रेक तापामानाची नोंद! नागरिकही हैराण

तीन दिवसाच्या कालावधीत सोलापूर शहर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. रोज सरासरी 0.5 ते 0.8 अंश सेल्सिअसची वाढ होत आहे.वाढत्या उष्म्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उष्म्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत होती. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात रोज वाढ होत आहे. उन्हाच्या झळा जाणवत होत्या. सकाळपासूनच अंग घामाघूम होत होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात