विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 15 फेब्रुवारी : सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. राज्यभरातील अनेक नागरिक नाशिक बाजारपेठेत दागिने खरेदी करण्यास पसंती देतात. नाशिकमध्ये आज सोन्याचे दर स्थिर आहेत. तर चांदीच्या दरात मात्र 540 रुपयांनी घसरण झाली आहे. काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर 57 हजार 190 रुपये होता, आज ही बाजारात तोच दर आहे. काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर 52 हजार 430 रुपये होता,आज ही तोच दर आहे. आजचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,190 10 ग्रॅम 22 कॅरेट- 52,430 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,719 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,243 कालचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,190 10 ग्रॅम 22 कॅरेट- 52,430 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,726 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,253 Gold-Silver Rate Today in Pune : पुणेकरांनो, आज स्वस्त झालं सोनं, ‘इथं’ चेक करा भाव चांदीच्या दरात घसरण चांदीचे दर काल 66 हजार 590 रुपये किलो होते. आज दर 66 हजार 50 रुपयांवर आले आहेत. म्हणजे साधारण किलो मागे 540 रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे चांदीचे दागिने घेण्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. चांदीचे आजचे दर 66 हजार 50 रुपये किलो चांदीचे कालचे दर 66 हजार 590 रुपये किलो सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थीरता लक्षात घेता पुढील काळात सोने चांदीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण सोने चांदी मध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात. दागिन्यांना चांगली पसंती असते. त्यामुळे पुढील काळात भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया नाशिक सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापुरकर यांनी दिली आहे.
(टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)