विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 13 फेब्रुवारी : सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. राज्यभरातील अनेक नागरिक नाशिक बाजारपेठेत दागिने खरेदी करण्यास पसंती देतात. सोने-चांदीची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये दोन दिवसांपासून दर स्थिर आहेत. आज सोने 57 हजार 410 प्रती तोळा तर चांदी 66 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. आजचे दर सोन्याचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,410 10 ग्रॅम 22 कॅरेट- 52,630 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,741 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,263 कालचे सोन्याचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,410 10 ग्रॅम 22 कॅरेट- 52,630 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,741 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,263
चांदीचे दर ही दोन दिवसांपासून स्थिर आहेत. 66 हजार 900 रुपये किलो चांदी नाशिक बाजारपेठेत मिळत आहे. सोन्याचे दर जास्त असल्यामुळे चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी महिला पसंती देत आहेत. चांदीचे आजचे दर 66 हजार 900 रुपये किलो चांदीचे कालचे दर 66 हजार 900 रुपये किलो
Gold-Silver Rate Today in Pune : सोने-चांदीच्या दरावर काय झाला परिणाम, पाहा पुण्याचे आजचे दर
या दागिन्यांना आहे विशेष मागणी आता बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.