जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Rate Today in Pune : सोने-चांदीच्या दरावर काय झाला परिणाम, पाहा पुण्याचे आजचे दर

Gold-Silver Rate Today in Pune : सोने-चांदीच्या दरावर काय झाला परिणाम, पाहा पुण्याचे आजचे दर

Gold-Silver Rate Today in Pune : सोने-चांदीच्या दरावर काय झाला परिणाम, पाहा पुण्याचे आजचे दर

Gold-silver rate today in Pune : लग्नसराईतही मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होत असते.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

    नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 13 फेब्रुवारी : मागच्या काही दिवसांत लोक सोन्याकडे उत्तम गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. लग्नसराईतही मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होत असते. लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करण्यासाठी अनेक जण पुण्याला पसंती देतात. पुण्यातील दागिन्यांची बाजारपेठ संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. देशातील वेगानं वाढणाऱ्या पुणे शहरात विविध पद्धतीचे ट्रेंडिग दागिने तयार करून मिळतात. त्यामुळे ग्राहकांचा इथं ओढा असतो. आज (13 फेब्रुवारी) पुणे शहरात सोने 58 हजार 831 प्रती तोळा आहे. तर चांदीचा आजचा दर 72 हजार 700 रुपये प्रती किलो इतका आहे. कमी दरात मिळणार का सोने? सोन्याची मागणी आणि पुरवठा, महागाई आणि रुपया-डॉलर मूल्यांकन यासारख्या विविध कारणांमुळे पुण्यातील सोन्याचे दर दररोज कमी जास्त होत असतात. सध्या बजेटमध्ये सोन्याच्या एक्सपोर्ट ड्यूटी कमी केले तरीही नजीकच्या काळामध्ये सोन्याचे भाव वाढण्याचे किंवा कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा होणार नाही. बजेटमध्ये एक्सपोर्ट ड्युटी कमी केली असली तरीही सोन्याची खरीदारी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुरू असते. त्यासोबतच विविध कारणामुळे देखील सोने सर्व सामान्य नागरिकांना कमी दरात मिळू शकत नाही.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पुण्यातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 58831 10 ग्रॅम 22 कॅरेट- 53942 10 ग्रॅम 18 कॅरेट- 43800 पुण्यातील आजचे सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5883 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5392 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4380 चांदी 72 हजार 700 रुपये किलो

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात