विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 3 मार्च : भारतीय लोकांना सोने चांदीचे आकर्षण असते. सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात. नाशिक मधील बाजारपेठेतही सोन्या चांदीच्या दरात दररोज चढउतार होत असतात. नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदीच्या दरात किलो मागे 110 रुपयांनी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर 56 हजार 480 रुपये आहे. तर 22 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर 51 हजार 780 रुपये आहे. सोन्याचे आजचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 56,480 10 ग्रॅम 22 कॅरेट- 51,780 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,648 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,178 सोन्याचे कालचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 56,480 10 ग्रॅम 22 कॅरेट- 51,780 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,648 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,178
Gold-Silver Rate Today in Pune : पुण्यातील सोनं महाग की स्वस्त? पाहा आजचे दर
चांदीच्या दरात वाढ चांदीचे दर काल 64 हजार 260 रुपये किलो होते. आज दर 64 हजार 370 रुपयांवर गेले आहेत. म्हणजे साधारण किलो मागे 110 रुपये वाढले आहेत. त्यामुळे चांदीचे दागिने घेण्यासाठी आज जास्त पैसे मोजावे लागतील. चांदीचे आजचे दर 64 हजार 370 रुपये चांदीचे कालचे दर 64 हजार 260 रुपये चांदीच्या दरात किलोमागे 110 रुपयांनी वाढ झाली आहे. पुढील काळात वाढ?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेता,पुढील काळात सोने,चांदीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोने चांदीमध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात. त्यामुळे पुढील काळात भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)