JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik news : सत्यजित तांबे दिसताच आजीबाई धावल्या अन्...,पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

Nashik news : सत्यजित तांबे दिसताच आजीबाई धावल्या अन्...,पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि एका आजीबाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जाहिरात

आजीबाईंनी घेतली सत्यजित तांबेंची भेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 29 मे :  नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि एका आजीबाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ संगमनेर शहारातील आहे. संगमनेरमध्ये एक आजीबाई तांबे यांच्या घरासमोरून जात असताना अचानक त्यांना सत्यजित तांबे दिसले. त्यानंतर आजीबाईंनी गेटच्या आतमध्ये जाऊन, मायेनं तांबे यांना जवळ घेऊन मिठी मारली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी देखील आजींची आस्थेनं विचारपूस करत त्यांच्याशी दिलखुलास  गप्पा मारल्या.  डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेले सत्यजित तांबे आज आमदार झाल्याचा आनंद त्या आजीबाईंच्या डोळ्यात दिसून येत होता. अतिशय भावूक करणारा असा हा प्रसंग होता. आजीबाईंनी सत्यजित तांबे यांना मोठ्या मायने जवळ घेतले, त्यानंतर तेवढ्याच अस्तेवाईकपणे सत्यजित तांबे यांनी या आजीबाईंची चौकशी केली. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

   नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी   नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यभरात गाजली. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होती. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तर भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र निवडणुकीपूर्वी दोन दिवस आधी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्यानं या निवडणुकीत मोठी चूरस निर्माण झाली होती. अखेर या लढतीमध्ये सत्यजित तांबे यांनी बाजी मारली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या