dada bhuse
मालेगाव, 21 फेब्रुवारी : मालेगाव महानगरपालिकेने साफसफाईसाठी शहरातील कचरा संकलन करणाराऱ्या ठेकेदाराकडून वजन काट्यावर घोटाळ्याचा पालकमंत्री दादा भुसे यांनी पर्दाफाश केला. तसंच घंटा गाड्या आणि इतर वाहने खरेदी करण्यात झालेला घोटाळा उघडकीस आणल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता मंत्री भुसे यांनी या बाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. शहर स्वछ अभियान अंतर्गत मालेगाव महापालिका प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्चून 53 घंटा गाड्यासह इतर अनेक वाहने खरेदी केली होती. मात्र त्याचा वापर करण्यात आला नाही. कोट्यवधी रुपयांची ही सर्व वाहने धूळ खात पडून आहेत. एकीकडे शहर स्वछ ठेवण्यासाठी घंटा गाड्या आणि इतर वाहने खरेदी करण्यात आली. शिवाय पुरेसे कर्मचारी असताना दुसरीकडे साफसफाईचा ठेका देण्यात आला आहे. हेही वाचा : धक्कादायक! मंत्रतंत्र, जादूटोणा अन् वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण; नाशिक हादरले! वाहन खरेदीत घोटाळा करण्यात आल्याचा संशय याआधी व्यक्त केला जात होता. त्यातच कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराकडून वजन काट्यावर घोटाळा केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पाहणी केली. तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मंत्री दादा भुसे या प्रकारानंतर संतप्त झाले आणि त्यांनी कचरा मोजणारा वजन काटा सील करण्याबरोबर घंटा गाड्या आणि इतर वाहने खरेदी करण्यात बाबत चौकशीचे आदेश दिले. घंटा गाड्या आणि इतर वाहने खरेदी केल्यानंतर त्या तशाच धुळखात पडून आहे. काही गाड्यांचे बॅटरी आणि इतर साहित्य चोरी गेल्याचे मनपा कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मालेगाव विधायक संघर्ष समितीने केली आहे.