JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दुचाकी उभी करून झाडाखाली बसले होते, भरधाव बस आली आणि 8 वर्षांच्या लेकीसह आई-वडिलांना चिरडलं

दुचाकी उभी करून झाडाखाली बसले होते, भरधाव बस आली आणि 8 वर्षांच्या लेकीसह आई-वडिलांना चिरडलं

कालच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आज

जाहिरात

कालच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 09 मार्च : नाशिकमधून आणखी एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वनी-सापुतारा रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकीना धडक दिली. या अपघातात 8 महिन्याची मुलगी त्याचे वडील आणि आई असे एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वणी-सापुतारा रस्त्यावर सुरगाणा इथं खोरी फाट्याजवळ हा अपघात घडला. भरधाव बसने 2 दुचाकीला जोराची धडक दिली. धडक बसल्यानंतर दोन्ही दुचाकीवरील तिघे जण चाकाखाली सापडले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन वाजेच्या सुमारास सुरगाणा -नाशिक ही एसटी बस वणी सापुतारा रस्त्यावरुन येत असाताना खोरिफाटा परिसरात या एसटीने दोन दुचाकींना धडक दिली. विशाल नंदु शेवरे (वय 24), अमृता विशाल शेवरे मुलगी (वय 8 महिने ), सायली विशाल शेवरे ( 22 राहणार सारोळे खुर्द,या. निफाड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. खोरीफाटा परिसरात एक दुचाकी रस्त्यालगत उभी होती. तर त्यावरील लोक झाडाखाली बसलेले होती. त्यावेळी बसने दुचाकीला, धडक देत समोरुन येणाऱ्याला धडक दिली आणि आणखी एका दुचाकीला धडक दिली. यावेळी सुमारे 30 ते 35 मिटर अंतरापर्यत या दुचाकीला फरफटत नेले आणि या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, एस टी बसमधील देखील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात मृत्यू पावलेले दुचाकीवरील हे सारोळा खुर्द तालुका निफाड येथील असल्याची माहिती मिळाली आहे. कालच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आज जिल्ह्यातीलच वनी सापुतारा महामार्गावर एकाच कुटुंबातील दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एसटी चालकाच्या अनिंयत्रीत वेगामुळे व दुर्लक्षामुळे एकाच कुटुंबातील तिघे मृत्युमुखी पडले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या