JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अवघ्या 6 मिनिटात व्यक्तिचित्र रेखाटणारा कलाकार, विश्वास बसत नसेल तर पाहा Video

अवघ्या 6 मिनिटात व्यक्तिचित्र रेखाटणारा कलाकार, विश्वास बसत नसेल तर पाहा Video

Jitendra Wankhede : या चित्रकाराची सध्या नाशिक शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. अतिशय उत्कृष्ट चित्र ते अवघ्या 6 मिनिटात साकारत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 13 फेब्रुवारी : जितेंद्र वानखेडे या चित्रकाराची सध्या  नाशिक शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. अतिशय उत्कृष्ट चित्र जितेंद्र अवघ्या 6 मिनिटात साकारत असतात. शहरातील कोणत्याही भागात गेल्यानंतर अनेक जण त्यांना आपलं स्वतःचं चित्र रेखाटण्यास सांगतात आणि जितेंद्र तिथेच बसून त्या व्यक्तीचं चित्र अवघ्या 6 मिनिटात हुबेहूब रेखाटतात. त्यामुळे त्यांच्या या कलेचं नाशिक शहरात कौतुक होत आहे. कशी झाली सुरुवात?  जितेंद्र वानखेडे यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. मूळचे वाशिम जिल्ह्यातील असलेले वानखेडे कुटुंब सध्या कामानिमित्त नाशिकमध्ये स्थायिक झाले आहे. के.टी.एच.एम महाविद्यालयातून त्यांनी चित्रकलेची पदवी घेतली आहे. आतापर्यंत जितेंद्र वानखेडे यांनी विविध प्रकारची चित्र हुबेहूब रेखाटले आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक वेळा सन्मान देखील करण्यात आला आहे. चित्रकलेसोबतच ते मंदिरांना रंग रंगोटी करण्याचे काम देखील उत्कृष्ट पद्धतीने करत असतात. त्यांच्या या कामाचा घरच्या परिवाराला देखील हेवा वाटत आहे. त्यांची चित्रकला बघून घरातील लहान मुलं देखील चित्र रेखाटत आहेत.

6 मिनिटात हुबेहूब चित्र रेखाटतात कोणत्याही कलेचा आविष्कार ती कला साकारणाऱ्या कलाकाराप्रमाणेच इतर लोकांनाही आनंद देणारा असतो. चित्रकला त्यापैकीच एक होय. अनेक चित्रकारांसाठी ही कला समाधान, आनंदासोबतच उत्पन्नाचं साधन देखील असते. तुम्ही जगात अनेक प्रकारची चित्रे पाहिली असतील. अनेकदा विविध रंगच नाहीतर विविध मिश्रण वापरूनही चित्र काढली जातात. मात्र ,जितेंद्र वानखेडे हे चित्रकार अवघ्या 6 मिनिटात समोर बसलेल्या व्यक्तीचे अगदी हुबेहुब लाईव्ह चित्र रेखाटत असतात. नागरिकांना ही चित्र खुप आवडतात अशी प्रतिक्रिया चित्रकार जितेंद्र वानखेडे यांनी दिली आहे. चित्रकला बनली जगण्याचं साधन साहजिकच कोणालाही आपली चित्रफीत बघण्यास आवड असते. त्यामुळे जितेंद्र यांच्याकडून अनेक जण आपलं चित्र रेखाटून घेत असतात. यामुळे जितेंद्र यांना पैसे मिळतात आणि यावरच त्यांचा घरचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. अजून यामध्ये चांगला बदल करून त्यांना उत्कृष्ट चित्रकार बनण्याचं स्वप्न आहे.

Nashik : तब्बल 21 हजार रुद्राक्षांपासून बनवलं खास जॅकेट, आरोग्यालाही आहे फायदा! Video

संबंधित बातम्या

सर्वजण करतात कौतुक एखादा व्यक्ती समोर जरी नसेल तरी त्या व्यक्तीच्या वर्णनावरून जितेंद्र अगदी हुबेहूब त्या व्यक्तीची प्रतिकृती रेखाटतात. त्यामुळे त्यांच्या या कल्पक बुद्धीची देखील अनेक जण प्रशंसा करत आहेत. जितेंद्र यांना आपल्या मुलांना देखील ही कला यावी असं वाटत आहे. त्यामुळे ते आपल्या लहान मुलांना देखील चित्रकलेचे धडे देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या