नाशिक 23 जानेवारी : आपण चांगलं दिसण्यासाठी चांगले कपडे घालावे असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामधून वेगवेगळे कपडे आणि त्यावर मॅचिंग अशा जॅकेटची फॅशन आलीय. एखाद्या औपचारिक कार्यक्रमापासून ते लग्नसमारंभापर्यंत सर्व ठिकाणी घालण्यासाठीचे जॅकेटचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मोदी जॅकेट चांगलेच ट्रेंडिंगमध्ये असतं. पण,
नाशिकच्या
अरविंद बनकर यांनी चक्क रूद्राक्षापासून जॅकेट तयार केलंय. या जॅकेटची बाजारात चांगलीच चर्चा आहे. 21 हजार रुद्राक्षांचा वापर अरविंद बनकर यांची रुद्र ज्योती संस्था आहे. त्यांना लहानपणापासूनच रुद्राक्षाच्या विविध वस्तू बनवण्याचा छंद आहे. त्यांंनी नुकतंच रुद्राक्षापासून जॅकेट तयार केलंय. यामध्ये त्यांनी जवळपास 21 हजार रुद्राक्ष वापरली आहेत. हे सर्व पंचमुखी रुद्राक्ष असून त्यांनी ते नेपाळमधून आणले आहेत. बनकर यांनी या जॅकेटची डिझाईन अत्यंत सुदर प्रकारे केलीय. त्यांनी यामध्ये अतिशय बारकाईन विणकाम केलंय. हे जॅकेट बनवण्यासाठी त्यांना 25 दिवस लागले आहेत.
मुंबईतील सर्वात स्वस्त ज्वेलरी मार्केट, लहान उद्योजकांसाठी आहे वरदान! Video
किती आहे किंमत? बाजारातील एखाद्या सामान्य जॅकेटची किंमत दोन ते तीन हजार रुपये असते. हे जॅकेट संपूर्णपणे रुद्राक्षांपासून बनवले आहे. हे सर्व रुद्राक्ष ओरिजनल आहेत. कोणतेही बनावट रुद्राक्ष यामध्ये वापरलेले नाही. या रुद्राक्षांची किंमत सध्या जास्त आहे. त्यामुळे सर्व खर्च आणि बनवण्याची मजुरी धरून या जॅकेटची किंमत 51 हजार रुपये इतकी असल्याची माहिती बनकर यांनी दिली. रुद्राक्ष हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या जॅकेटचा आरोग्यासाठीही चांगला फायदा होईल. तसंच रक्तपुरवठा देखील या जॅकेटमुळे सुरळीत होतो. विशेषत: ध्यान करताना हे जॅकेट अधिक फायदेशीर असल्याचा दावा बनकर यांनी केलाय.
कुठे खरेदी करणार? ww.rudrajyoti.com या वेबसाईटवर पत्ता दिल्यास तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि हे जॅकेट तुम्हाला मिळेल, अशी माहिती बनकर यांनी दिलीय.