JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Samruddhi Highway : देवदर्शनाहून निघाले पण...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर

Samruddhi Highway : देवदर्शनाहून निघाले पण...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. सिन्नरच्या आगासखिंड गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 25 जून : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. सिन्नरच्या आगासखिंड गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डीहून मुंबईकडे जात असताना ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त शिर्डीला दर्शनासाठी आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी महामार्गावर असलेल्या कठड्याला धडकून कार खाली कोसळली. जखमींना घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचुर झाला आहे. मोठी बातमी! दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; डबे रुळावरून घसरले, 14 रेल्वे रद्द याआधी 20 तारखेलाही समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात झाला होता, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. कारंजा ते दोनद दरम्यान भरधाव ट्रक पुलावरून खाली कोसळला, त्यानंतर ट्रकने पेट घेतला. या अपघातामध्ये दोघांचा जळून मृत्यू झाला. नाशिकहून कांदे भरून हा ट्रक कोलकात्याच्या दिशेने चालला होता. तेव्हा रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, ज्यामध्ये ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराचा होरपळून मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या