जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; डबे रुळावरून घसरले, 14 रेल्वे रद्द

मोठी बातमी! दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; डबे रुळावरून घसरले, 14 रेल्वे रद्द

माल गाड्यांचा भिषण अपघात

माल गाड्यांचा भिषण अपघात

आज रेल्वेच्या दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत.

  • -MIN READ Kolkata,Kolkata,West Bengal
  • Last Updated :

कोलकाता, 25 जून : पश्चिम बंगालमधील बांकुरा परिसरात आज रेल्वेच्या दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. हा अपघात राज्यातील ओडा स्टेशन जवळ घडला. मिळत असलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी चार वजेदरम्यान बांकुराजवळ दोन मालगाड्यांचा अपघात झाला. त्यानंतर अनेक डबे रुळावरून खाली घसरले. मागून येणाऱ्या माल गाडीने समोर चाललेल्या मालगाडीला मागून धडक दिली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. केवळ एका मालगाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघाताचं कारण अस्पष्ट  रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त दोन्ही मालगाडीमध्ये कोणतंही सामान नव्हतं. मात्र त्यांचा अपघात नेमका कसा झाला याच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 14 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर तीन रेल्वे गाडयांचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. रेल्वे सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे हा अपघात सिग्नलमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडणीमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. समोर जाणाऱ्या मालगाडीला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. या अपघातामध्ये आठ डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: train
  • First Published :
जाहिरात
जाहिरात