JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक प्रशासन हादरलं! पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण

नाशिक प्रशासन हादरलं! पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण

नाशिक शहरात कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 24 डिसेंबर: नाशिक शहरात कोरोनाचा (Coronavirus Nashik) पुन्हा धोका वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू  झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Maharashtra Police Academy, Nashik)  170 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे महापालिका नाशिक जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासनही हादरलं आहे. हेही वाचा…. धक्कादायक! मुंबईत ऑन-ड्यूटी पोलीस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून केली आत्महत्या नाशिक शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल 170 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रांत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जाते. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू… गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं जिल्हा प्रशासनाची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे. त्यात काल कोरोनामुळे अवघ्या तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. बालकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात आठवड्यापासून उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना बालकाची प्राणज्योत मालवली. बाळाला इतरही काही गंभीर आजार होते, असंही समजतं. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे. हेही वाचा…. मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला! राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश नाकाबंदी लागू.. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्याप्रमाणे नाशिक शहरात देखील रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. राज्य सरकारनं या वेळेत संचारबंदी आदेश दिले आहे. या आदेशान्वये आता शहरात नाकाबंदी केली जाणार आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या