JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मध्यरात्री उठला, नवे कपडे घालून लावला टिळा; FB लाइव्ह करत तरुणाचं धक्कादायक पाऊल

मध्यरात्री उठला, नवे कपडे घालून लावला टिळा; FB लाइव्ह करत तरुणाचं धक्कादायक पाऊल

एका २७ वर्षीय तरुणाने मध्यरात्री फेसबुक लाइव्ह करून गळफास घेत जीवन संपवल्याच्या घटनेने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 05 एप्रिल : फेसबुक लाइव्ह करत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीय. नवीन कामठी इथं राहणाऱ्या कृतांक डोंगरे या २७ वर्षीय तरुणाने गळफास घेत जीवन संपवलं. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कृतांकचे चार वर्षांपूर्वी लग्नही झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कृतांकचे त्याच्या पत्नीसोबत वाद होत होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यानंतर तो तणावात होता. घरातील लोक कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तो एकटाच घरी होता. कृतांकने गळफास घेत आत्महत्या करण्याआधी मध्यरात्री नवे कपडे घातले. त्यानंतर दीड वाजता मोबाईलवरून फेसबुक लाईव्ह केलं. सहाय्यक पोलीस निरीक्षकानं हे काय केलं, पत्नी आणि मुलावरच झाडल्या गोळ्या…   कृतांकने पंख्याला कापड बांधून ते मजबूत असल्याची खात्री केली. त्यानंतर कपाळाला टीळा लावून मी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी एका नातेवाईकाला फेसबुकवर तो आत्महत्या करत असल्याचं दिसलं. तेव्हा त्याने तात्काळ कृतांकच्या शेजाऱ्याला माहिती दिली. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, पण तोपर्यंत कृतांकने गळफास घेतला होता. शेजाऱ्यांनी नवीन कामठी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कृतांकला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेने नवीन कामठीत खळबळ उडाली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या