जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / सहाय्यक पोलीस निरीक्षकानं हे काय केलं, पत्नी आणि मुलावरच झाडल्या गोळ्या...

सहाय्यक पोलीस निरीक्षकानं हे काय केलं, पत्नी आणि मुलावरच झाडल्या गोळ्या...

प्रतिकात्मक फोटो (क्रेडिट - पीटीआय)

प्रतिकात्मक फोटो (क्रेडिट - पीटीआय)

एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलासोबत धक्कादायक कृत्य केलं.

  • -MIN READ Local18 Punjab
  • Last Updated :

गुरदासपूर, 4 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील गुरुदासपूरमधून ही मोठी घटना समोर आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पंजाब पोलिसांच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाने पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर त्याने आपल्या पाळीव कुत्र्यालाही मारले. घटनेनंतर आरोपी पोलीस अधिकारी फरार झाला आहे. या घटनेची माहिती गावच्या सरपंचाने फोनवरून पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच आरोपीचा शोध घेतला जात आहे. ही धक्कादायक घटना पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील आहे. पंजाब पोलीसमध्ये असलेला 48 वर्षीय एएसआय भूपिंदर सिंग यांने गुरुदासपूरच्या भुंबली गावात त्याची 40 वर्षीय पत्नी बलजीत कौरवर गोळ्या झाडल्या, असे सांगितले जात आहे. त्यासोबतच त्‍याने त्‍याचा 19 वर्षांचा मुलगा बलप्रीत सिंह यालाही गोळी झाडून ठार केले. एएसआयने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने पत्नीला 3 आणि मुलाला 6 गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान घरात असलेल्या पाळीव कुत्र्यालाही त्याने ठार केले. मध्यरात्रीची वेळ अन् माथेफिरुचा पत्नीसह दोन विवाहित मुलींवर हल्ला; हादरवणारी घटना दरम्यान, या घटनेची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आई आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपी एएसआय भूपिंदर सिंग सध्या फरार असून अजून त्याला अटक झालेली नाही. या प्रकरणाची माहिती देताना एसएसपी गुरुदासपूर यांनी सांगितले की, पत्नी, मुलगा आणि कुत्र्याची हत्या केल्यानंतर आरोपी एएसआय घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात