JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सावरकरांच्या मुद्यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना नागपुरी शब्दात सुनावलं, म्हणाले...

सावरकरांच्या मुद्यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना नागपुरी शब्दात सुनावलं, म्हणाले...

‘राहुल गांधी तुम्ही जन्मात सावरकर होऊ शकत नाही, त्यांच्या केसाची देखील ते बरोबरी करू शकत नाही’

जाहिरात

(देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 27 मे : ‘राहुल गांधी जेव्हा म्हणतात मी सावरकर नाही. तेव्हा मला वाटतं राहुल गांधींची ती औकाद नाही, मी औकड शब्द वापरला तर लोक वेगळा अर्थ काढतात पण नागपुरात त्याला क्षमता म्हणतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यामुळे राहुल गांधींना सावरकर समजणार नाही’ असं म्हणत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या कादंबरीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ‘सावरकरांवर खूप साहित्य लिहिलं गेलं त्यांनी स्वतः मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं. माझी आत्मकथा या पुस्तकातून अंदमानातील संघर्ष सावरकरांनी मांडला. अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे सावरकर यांच्यावर लेखन केलं. सावरकर यांच्यावर कादंबरी दिसत नाही, वस्तुनिषठपणे ही कादंबरी लिहिली. मी कधी कधी विचार करतो राहुल गांधींची आभार मानणे पाहिजे. जेव्हा जेव्हा समाज सावरकर यांना विसरतो तेव्हा राहुल गांधी बोलतात आणि लोक पेटून उठतात. भारतीय समाज आवाहन आल्यावर पेटून उठतात. ही कादंबरी लिहिली या साठी लेखिकेचे आभार मानायचे की राहुल गांधीचे हे मला समजत नाही. राहुल गांधी तुम्ही जन्मात सावरकर होऊ शकत नाही, त्यांच्या केसाची देखील ते बरोबरी करू शकत नाही, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.

‘सावरकरांनी इंग्लंड मध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवत ठेवली. आमचा स्वातंत्र्याचा इतिहास सावरकरांनी समोर आणला. सावरकरांची शक्ती इंग्रजांनी ओळखली होती. भारताची शक्ती हा तरुण पेटवू शकतो हे माहिती होतं. त्यामुळे त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही. भारतीय समाज रसातळाला कसा गेला हे सावरकरांनी समजून घेतलं. सावरकरांनी समाजाला दिशा दिली. जाती भेद संपविण्यासाठी प्रयत्न केले, असंही फडणवीस म्हणाले. (असा आहे महाराष्ट्राचा रोडमॅप, मुख्यमंत्री शिंदेंनी एक एक मुद्दा मांडला, राज्यासाठी केली मोठी मागणी) ‘महापौर हा शब्द सावरकरांनी दिला हे मी महापौर झाल्यावर मला कळलं. विधानमंडळ हा शब्द सावरकरांनी दिला. सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी समोर न्याय द्यावा लागेल. काँग्रेसने सावरकर आणि आंबेडकरांना,सुभाष चंद्र बोस यांना कधी स्वीकारला नाही यांना नाकारलं. सावरकर यांचे विचार कोणी संपवू शकत नाही, असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. ‘शिवाजी महाराजांची आरती सावरकरांनी लिहिली. वाचनाची आवड नसलेल्या ऑडिओ बुक आणावी आपले साहित्य पोहोचत नसेल तर आपला पराभव आहे. या कादंबरीच्या ऑडिओ book साठी जो खर्च येईल तो मी उचलणार, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या