JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: छंद माझा वेगळा... 30 वर्षांपासून नागपूरकरांना आनंद देणारा महोत्सव, Video

Nagpur News: छंद माझा वेगळा... 30 वर्षांपासून नागपूरकरांना आनंद देणारा महोत्सव, Video

नागपुरात कलाकारांच्या अनोख्या मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 30 वर्षांपासून रमेश सातपुते हे छंद महोत्सवाचे आयोजन करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 21 एप्रिल: व्यक्तिगत जीवनात कुठलातरी छंद माणसाचे आयुष्य अधिक समृद्ध करत असतो. शिवाय हाच छंद समाजात एक वेगळी ओळख देखील निर्माण करून देत असतो. अशाच छंद जोपासनाऱ्यांना एकत्र आणून नागपुरातील रमेश सातपुते ही मागील 30 वर्षांपासून छंद महोत्सवाचे आयोजन करत आहे. या छंद महोत्सवामुळे शहरातील सर्व छंद जोपासकांना आपला छंद लोकांपुढे प्रदर्शन करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध कलाकृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी छंद महोत्सवामुळे एकाच ठिकाणी सर्व छंद जोपासकांच्या अप्रतिम कलाकृती आणि छंद नागरिकांना बघता येत आहे. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील खुले दालनात या छंद मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील छंद प्रेमींनी जोपासलेली त्यांची कला या छंद महोत्सवामुळे एकाच ठिकाणी बघता येत आहे. नागरिकांनी देखील या प्रदर्शनाला पसंती दिली आहे.

30 वर्षापासून दरवर्षी भरतो छंद महोत्सव प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला छंद असतो. कलेशी जडलेली मैत्री दैनंदिन जीवनातून मिळालेल्या फावल्या वेळेला सत्कर्मी लावत असते. मात्र ही कला केवळ आपल्या पुरती मर्यादित न राहता ती लोकांपुढे यावी या उद्देशाने छंद महोत्सव सुरू झाला. ज्येष्ठ कलाकार, विदर्भरत्न रमेश सातपुते यांनी नागपुरातील सर्व कलाकार, छंद जोपासकांची मोट बांधली. छंद महोत्सव ही संस्था स्थापन करू गेल्या गेल्या 30 वर्षांपासून ते छंद महोत्सवाचे आयोजन करत आहेत. कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन रमेश सातपुते यांनी या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने शहरातील विविध भागात छंद जोपासकांच्या संग्रही असलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट असे की यात कुठलीही वयाची अट नाही किंवा हे प्रदर्शन बघण्यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारण्यात येत नाही. विविध वस्तूंची प्रदर्शन आणि या कलात्मक वस्तूंची विक्री देखील या प्रदर्शनात होत असते. त्यातून त्या कलाकारांना अर्थार्जन होत, अशी माहिती छंद महोत्सवाचे आयोजक सातपुते यांनी दिली. Latur News: लातूरमध्ये आहे देशातील पहिला मॉल, पाहा 16 रस्ते एकत्र येणारे ऐतिहासिक मार्केट, Video तब्बल 16 कलाकारांच्या कलात्मक वस्तूंचे स्टॉल यंदा असेच प्रदर्शन जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातील खुले दालनात भरवण्यात आले आहे. यामध्ये 16 स्टॉल असून त्यात प्रामुख्याने निलिमा हजारे मून निर्मित साबनावरील कलाकृती, ओंकार तलमले निर्मित लाकडी कलाकृती, रमेश सातपुते यांचे चित्र, पौर्णिमा सातपुते काळे यांचे भरतकाम, लक्ष्मण लोखंडे यांचे हस्ताक्षर संग्रह पाहायला मिळत आहे. तसेच नाणे संग्राहक कपिल बंसोड, रुपकिशोर कानोजिया, कीर्ती दुबे, कल्पना रामगिरिकर, रामसिंग ठाकूर आदींसह पराग पूरकर, सुरत अग्रवाल, कपिल बन्सोड, मृदुला खेडेकर यांचाही समावेश आहे. येत्या 21 एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले असणार असून सकाळी 11 ते 4 अशी वेळ आहे. अशी माहिती छंद महोत्सवाचे आयोजक रमेश सातपुते यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या