JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Bus Accident : जळालेले कपडे, तडकलेले फोन, उरला फक्त लोखंडी सांगाडा; जीवघेण्या अपघाताचा ग्राऊंड रिपोर्ट

Buldhana Bus Accident : जळालेले कपडे, तडकलेले फोन, उरला फक्त लोखंडी सांगाडा; जीवघेण्या अपघाताचा ग्राऊंड रिपोर्ट

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या बसला, सिंदखेडरराजा जवळ देऊळगाव खोंड परिसरात अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला.

जाहिरात

बुलडाणा अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा : नागपूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या बसचा भीषण अपघात झाला आहे. सिंदखेड राजा परिसरात मध्यरात्री खासगी बसलाचा अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर न्यूज 18 लोकमतने तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळावरील स्थिती हृदयद्रावक आहे. बसचा केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक आहे. संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. काहींचे डबे, मोबाईल तर कुठे अर्धवट जळलेल्या बॅगा अशी अवस्था तिथे पाहायला मिळाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत आता चौकशी सुरू आहे. बस चालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. तर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तिथे तपास करत आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

Buldhana Bus Accident : स्वप्न जळून खाक, संजीवनीचा ‘तो’ प्रवास ठरला शेवटचा; 25 जणांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला!

नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या बसला, सिंदखेडरराजा जवळ देऊळगाव खोंड परिसरात अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला. अपघातावेळी बसमध्ये 33 प्रवासी होती. 8 प्रवासी बचावले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा येथील प्रवासी असल्याची माहिती समोर आलीय. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही खासगी बस समृद्धी महामार्गावरी ल सिमेंटच्या कठड्याला धडकली.

Buldhana Bus Accident : बस 5 वाजता नागपूरहून निघाली अन्…, जाणून घ्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

बस पलटी झाल्यानंतर टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली आहे. त्यानंतर डीझेल टँकला धडक बसली. त्यानंतर टँक फुटल्याने बसने पेट घेतला. अपघातानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.साखरझोपेत असलेल्या प्रवाशांना या अपघातातून सावरण्याची संधीही मिळाली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या