विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर 22 जून : जगन्नाथ पुरी येथील ऐतिहासिक रथयात्रा हे तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी या रथयात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या जगन्ना थपुरी रथायात्रेत नागपूरकर भोसले प्रथम रघुजीराजे महाराज यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. नागपुरात देखील आंतरराष्टीय कृष्ण भावनामृत संघ आणि इस्कॉन नागपुरच्या वतीने भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि शुभद्रा माता यांची भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शेकडोंच्या संख्येने नागपूरकर या यात्रेत सहभागी झाले असून ही रथयात्रा शहरातील अनेक भागातून मार्गस्थ झाली. पुन्हा सुरू केली जगन्नाथ पुरी रथयात्रा जगन्नाथ पुरी येथून दरवर्षी निघणारी ऐतिहासिक रथयात्रा ही देशातील महत्त्वपूर्ण रथयात्रा आहे. इतिहासात जगन्नाथ पुरी रथयात्रा आणि महाराष्ट्राचे एक नाते आहे. नागपूरकर आद्य रघुजी महाराज भोसल्यांनी यवनी आक्रमणामुळे बंद पडलेली जगन्नाथ पुरी रथयात्रा सन 1751 साली पुन्हा सुरू केली. ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. जगभरात आज जगन्नाथ स्वामींची रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात असतांना नागपुरात देखील आंतरराष्टीय कृष्ण भावनामृत संघ आणि इस्कॉन नागपुरच्या वतीने भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि शुभद्रा माता यांची भव्य रथयात्रेचे गेल्या 15-16 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे.
ही अतिशय आनंदाची आणि सौभ्याग्याची बाब आहे. जगन्नाथ स्वामींनी पृथ्वीवर केलेले कार्य, त्यांचा महिमा त्यांचा आशीर्वाद या रथायात्रेच्या निमित्ताने भाविकांपर्यंत पोहचतो आहे. यासाठी संपूर्ण इस्कॉन समितीचे धन्यवाद करावे तेवढे थोडे आहे, अशी भावना नागपूर नगरीचे राजे श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केली. रथयात्रेचे फार महत्त्व आहे नागपूरच्या विकासासाठी, नागपूरकरांच्या प्रसन्नतेसाठी, उत्तम स्वास्थ, उत्तम बुद्धी, भक्ती प्राप्तीसाठी या रथयात्रेचे प्रयोजन करण्यात आले आहे. रथावरील देवांचे जो दर्शन घेतो त्याचे पुनर्जन्म होत नाही, इतके महत्त्व या रथावरील देवतांना बघण्याचे आहे. ही रथयात्रा शहरातील पोदारेश्वर राम मंदिर, अग्रेसन चौक, टांगा स्टॅन्ड असं होत- होत शेवट हा गीता मंदिर येथे होणार आहे. या रथयात्रेत समाजातील प्रत्येक जातीधर्मातील लोक सहभागी होऊन हा जगन्नाथाचा रथ ओढत आहेत. वाटेत एक लाख खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच 5 हजार लोकांसाठी भोजन स्वरूपात प्रसाद वितरण करण्याचे आयोजन केले आहे. नागरिक मोठ्या संख्येने या रथयात्रेत भजन- कीर्तन करत भक्तीरसात तल्लीन झाले आहे. भगवान हे कलियुगात अवतार घेत असतात, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अंतकरणात भगवंताचे अधिष्ठान करावे. यासाठी या रथयात्रेचे फार महत्त्व आहे, अशी माहिती नागपूर इस्कॉनचे रिजनल सेक्रेटरी कीर्तन दास यांनी दिली..