विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 5 जून : 6 जुन 1674 साली किल्ले रायगडावर संपन्न झालेला श्री शिवराज्याभिषेक सोहळा हा मध्ययुगीन भरतातील एक अभूतपूर्व क्रांती होती. या घटनेनंतर देशाचा संपूर्ण इतिहास बदलला. कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्य निर्माण झालं. यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं साडेतीनशेवे वर्ष सुरू आहे. या निमित्तानं नागपूरमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. उलगडला महाराजांचा इतिहास नागपूर महानगर पालिका आणि श्री शिवराज्यभिषेक सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यनानानं 3D मॅपिंग लेझर शोचं आयोजन करण्यात आलंय. या पद्धतीचा हा नागपूरचा पहिला आणि देशातील चौथा कार्यक्रम आहे.
शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग या लेझर शोमध्ये दाखवण्यात आले आहेत. नव्या पिढीला शिवाजीमहाराजांचा इतिहास समजावा यासाठी या पद्धतीचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त WhatsApp Statusला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाप असलेला हा देशातील चौथा प्रयोग आहे. यापूर्वी मुंबईत दोनदा या प्रकारचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर जी20 परिषदेच्या निमित्तानं झालेल्या बैठकीच्या दरम्यान असा शो झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नागपूरमध्ये या प्रकारचा कार्यक्रम होतोय. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना 3 D मॅपिंगच्या मार्फत आम्ही इथं सादर केल्या आहेत. ते पाहून नागपूरकर भारावले आहेत,’ असं महापालिकेच्या महसूल विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितलं.