JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'त्यांनी वडिलांसाठी काय केलं'? उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यापूर्वीच शिंदे गटाचा हल्लाबोल

'त्यांनी वडिलांसाठी काय केलं'? उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यापूर्वीच शिंदे गटाचा हल्लाबोल

बाळासाहेब हे विश्ववंदनीय महापुरुष असून ते काही कोणाची खासगी मालमत्ता नाही असं म्हणत शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 26 जानेवारी : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शिंदे गट आणि ठाकरे गट कायमच आमने-सामने येत असल्याचं पहायला मिळत आहे. आता या वादात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेब हे विश्ववंदनीय महापुरुष असून ते काही कोणाची खासगी मालमत्ता नाही असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले गायकवाड?  शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे  काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. ते विश्ववंदनीय महापुरुष आहेत. देशाचा महापुरुष हा कोण्या एकट्याचा नसतो. त्यामुळे कोणी कितीही ओरडले तरी कायदेशीरदृष्या कोणी काहीच करू शकत नाही. आपण आपल्या वडिलांसाठी काय केलं? आणि आमच्यासारख्या लोकांनी किती रक्त सांडलं हे पहावं. ‘बाळासाहेबांवर आमचा हक्क’   मावळेसोबत होते म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहोचले. बाळासाहेब हे महापुरुष आहेत. त्यामुळे महापुरुष म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचा हक्क आहे. असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला आहे. आता संजय गायकवाड यांच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या