JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुम्हाला व्हायचं डॉग ट्रेनर? इंजिनिअर तरुणाकडून जाणून घ्या श्वानांची संपूर्ण माहिती

तुम्हाला व्हायचं डॉग ट्रेनर? इंजिनिअर तरुणाकडून जाणून घ्या श्वानांची संपूर्ण माहिती

श्वान प्रशिक्षणाच्या छंदाला इंजिनिअर श्रीकांत वाढी यांनी करियरच बनवलंय. पाहा कसा आहे प्रवास

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 25 जुलै: एखादा छंद किंवा कला आपल्याला त्या विषयात एवढे पारंगत करत असतो की ते क्षेत्र आपल्याला एक वगळी ओळख निर्माण करून देत असतं. शिवाय त्यातच आपले करियर देखील घडवू शकतं. असाच काहीसा प्रकार नागपुरातील श्रीकांत वाढी या इलेक्ट्रोनिक आणि टेलि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलेल्या तरुणाच्या बाबतीत झाला आहे. लहानपणापासून श्वानांची आवड असलेल्या श्रीकांत याने आपले शिक्षण पूर्ण करत श्वान प्रशिक्षणाची आपली आवड जोपासली. आता हा छंदच त्याचं करियर बनलं आहे. श्वान प्रशिक्षणाचा छंदच झालं करिअर लहानपणापासूनच मला कुत्र्यांच्या लळा लागलेला होता. घरी कुत्र्यांचे पिल्लू आणून मी त्याची देखभाल करायचो. त्यांच्याशी वेळ घालवायचो. कुत्र्यांमध्ये मला इंटरेस्ट असल्याने वाढत्या वयासोबत ते पुढे वाढत गेलं. मी माझे एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये केले आहे. हे करत असताना डॉग ट्रेनिंगचे काम मी शिक्षणा सोबत सुरूच ठेवले होते. पाळीव श्वानांबद्दल जी क्रेझ होती ती हॉबीमध्ये रूपांतर झाली आणि नंतर ती पुढे जाऊन फॅशन आणि करिअरमध्ये रूपांतरीत झाली, असं श्रीकांत सांगतो.

श्वान प्रशिक्षणाचं ट्रेनिंग केलं सुरुवातीच्या काळामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून देश विदेशातील ऑनलाईन क्लासेस, डीव्हीडी यांच्या माध्यमातून मी प्रशिक्षण घेतले. कालांतराने भारतामध्ये देखील सेमिनार व्हायला लागले. त्या माध्यमातून माझा श्वान प्रशिक्षणाचा अभ्यास होत राहिला. शिक्षणाबरोबर असे लक्षात आले की श्वान प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. अनेक लोकांना आपल्या दैनंदिन जीवनात श्वानांशी निगडित अनेक अडचणी आणि समस्या आहेत. मी माझ्या परीने व माझ्या शिक्षणातून या अडचणी सोडवण्यास सुरुवात केली, असे श्रीकांत सांगतात. श्वान ट्रेनिंग करिअरचा चांगला पर्याय श्वान प्रशिक्षण सुरू केल्यानंतर मोबदला देखील चांगला मिळाला. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने हा एक उत्तम पर्याय असू शकतो, असा मी विचार केला. आज घडीला भारतात देशी तसेच विदेशी श्वान देखील मोठ्या संख्येने पाळले जातात. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये लोकांमध्ये तेवढी जागरूकता नव्हती. पण गेल्या चार-पाच वर्षात या क्षेत्रात चांगली जागरूकता वाढलेली आहे. भरपूर लोक ट्रेनिंग मध्ये आपले करिअर देखील घडवू पाहत आहे एक चांगली बाब आहे.असे मत श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांनी बोलताना व्यक्त केले. ‘अंगात येतो नागोबा, सापाचं विष टाकतो पिऊन’ भोंदूबाबाच्या स्टिंग ऑपरेशनचा VIDEO व्हायरल हजारांहून अधिक श्वानांना प्रशिक्षण या क्षेत्रात काम करत असताना मला अर्थाजन तर होतंच आहे. शिवाय मानसिक समाधान आणि आपल्या कामाचा आनंद हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मी इंजिनिअरिंग करून आपली शैक्षणिक बाजू भक्कम केलीच. सोबतच आपली हॉबी ही करिअर म्हणून देखील निवडली. आज फार आनंद होतो. लोकांच्या अडीअडचणी मी सोडवू शकतो. आजवर माझ्या हाती असलेल्या माहितीनुसार मी हजारहून अधिक श्वानांना प्रशिक्षण दिले आहे. या क्षेत्रात जागरूकता वाढल्याने आणि दिवसेंदिवस श्वान पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून या क्षेत्रामध्ये करिअरची चांगली संधी आहे, अशी माहिती श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या