JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नागपूर पुन्हा हादरलं; आरोपींनी मुलीला गाडीत बसवलं अन्..

सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नागपूर पुन्हा हादरलं; आरोपींनी मुलीला गाडीत बसवलं अन्..

नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 25 जानेवारी, प्रतिनिधी : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील ही घटना आहे. आठवडाभरापूर्वीच नागपूर जिल्ह्यातून एक सामूहीक अत्याचाराची घटना समोर आली होती. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर आरोपींनी बलात्कार केला होता, अत्याचारानंतर या महिलेची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आरोपी आणि मुलीची ओखळ?  घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. या विद्यार्थिनीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर या मुलीला खपा- कोदेगाव परिसरात नेऊन अत्याचार करण्यात आला. हे दोनही आरोपी संबंधित मुलीच्या ओळखीचे असल्यामुळेच ती त्या कारमध्ये बसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आरोपीने या संधीचा फायाद घेऊन मुलीवर अत्याचार केला.

आरोपींना अटक   या घडनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान करून या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  अक्की भोंग, पवन भासकवरे अशी या घटनेतील आरोपींची नावं आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात अशीच एक घटना जिल्ह्यात घडली होती. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. अत्याचारानंतर या महिलेची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजं असताना आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या