नागपूर, 15 जुलै : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील विविध भागात शिवसंपर्क दौऱ्यानिमीत्त संजय राऊत फिरत आहेत ते यानिमीत्त ते नागपुरात मुक्कामी आहेत. याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ही आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शरद पवार आणि संजय राऊत (sanjay raut & sharad pawar) यांची भेट होणार का याबाबत चर्चा रंगली आहे. तसेच पवार आणि राऊत दोघेही एकाच हॉटेलमध्ये राहणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत हे शिवसंपर्क अभियानासाठी दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा मुक्काम नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आज आपल्या दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहे व ते देखील हॉटेल रेडिसिन ब्ल्यू इथे थांबणार आहेत.
हे ही वाचा : नवी मुंबईत शिवसेनेला पुन्हा धक्का; आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील
शरद पवार हे अकरा वाजता नागपूर विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते थेट हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे जाणार आहेत. पवार यांनी हॉटेलवर दोन तास खाजगी बैठकीसाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यामुळे या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट होण्याची शक्यता आहे. सोबतच हे दोन नेते मुक्कामी देखील याच हॉटेल रेडिएशन ब्ल्यू येथे असल्याची माहिती आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर संजय राऊत आणि शरद पवार या दोघांची बैठक होणार असल्याची बोलले जात आहे. तसेच नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे.
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला
देवेंद्र फडणवीस आज (दि.15) अकरा वाजता ‘शिवतीर्था’वर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीच भेट होणार होती. पण पावसामुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील आगामी घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
हे ही वाचा : विदर्भातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू
विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या मंत्रिमंडळात मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण ती चर्चा खोटी असल्याचं नंतर उघड झालं. या सगळ्या घडामोडींदरम्यान फडणवीस-राज ठाकरे भेटीचं नेमकं गुपीत काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.