विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 3 मे : राज्यात उन्ह तापत असतानाच सोन्या-चांदीच्या दरांचा पाराही चढत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पुन्हा दरवाढ झाली आहे. नागपुरात आज सलग दुसऱ्या दिवशी 900 रुपयांनी सोनं महाग झालं. त्यामुळे नागपुरातील 24 कॅरेट सोन्याचा दर आज 61 हजार 400 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 300 रुपये प्रती 10 ग्रॅम रुपये आहे. चांदीच्या दरात झाली मोठी वाढ भारतीय लोकांना सोन्या-चांदीचं मोठं आकर्षण आहे. सण, उत्सव आणि घरगुती समारंभात लोक आवर्जुन सोनं खरेदी करतात. सोन्याच्या दागिन्यांसोबत महिला वर्गाची चांदीच्या दागिन्यांनाही पसंती असते. गेल्या महिन्याभराचा विचार करता चांदीचे दरही झपाट्याने वाढले आहेत. अक्षय्य तृतीयेनंतर चांदीचे दर काही प्रमाणात घटत असल्याचे दिसून आले. मंगळवारी चांदीच्या दरात घसरण झाली होती. तर आज पुन्हा 900 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी 75 हजार 900 रुपये प्रतिकिलो मिळणार आहे.
नागपूर शहरातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,400 10 ग्रॅम 22 कॅरेट- 58,300 10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,200 10 ग्रॅम 18 कॅरेट- 49,100 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,140 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,830 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,420 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,910 चांदीचे दर प्रतिकिलो - 75,900 प्लॅटिनम 40,000 Gold Silver Rates : पुणे तिथे…, सोनं नाही उणे, पाहा आजचे नवे दर नागपूर शहरातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,500 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,500 10 ग्रॅम 20 कॅरेट- 52,100 10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,400 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,050 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,750 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,210 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,840 चांदीचे दर प्रतिकिलो - 75,000 प्लॅटिनम 40,000 (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)