Gold Price in Nagpur : उपराजधानीत सोनं पुन्हा महागलं, पाहा आज किती वाढली किंमत
विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 5 मे : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मोठा सराफा बाजार आहे. विदर्भातून लोक या ठिकाणी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी येत असतात. येथील सोन्या-चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसारच ठरतात. त्यामुळे नागपूरच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर रोज बदलत असतात. सोन्याच्या दरात गुरुवारच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दरात 300 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे नागपुरातील 24 कॅरेट सोन्याचा दर आज 62 हजार 100 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 900 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. चांदीच्या दरात झाली मोठी वाढ सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही मोठी मागणी असते. गेल्या महिन्याभराचा विचार करता चांदीचे दरही झपाट्याने वाढले आहेत. तसेच या आठवड्यातही चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा गुरुवारच्या तुलनेत चांदीच्या दरात ब्बल 1,100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी 78 हजार 100 रुपये प्रतिकिलो मिळणार आहे.
सोनं गुंतवणुकीचा चांगला पर्याय भारतीय लोकांना सोन्या-चांदीचं मोठं आकर्षण आहे. सण, उत्सव आणि घरगुती समारंभात लोक आवर्जुन सोनं खरेदी करतात. तसेच सोन्याकडे गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे अनेकजण सोन्यात गुंतवणूक करत असतात. त्यातच पुढील काळात सोन्याची किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सोनं गुंतवणुकीचा सल्ला दिला जात आहे. Gold Price in Pune : पुण्यातील सोनं आज स्वस्त की महाग? लगेच चेक करा दर नागपूर शहरातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 62,100 10 ग्रॅम 22 कॅरेट- 58,900 10 ग्रॅम 20 कॅरेट- 56,100 10 ग्रॅम 18 कॅरेट- 50,600 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,210 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,890 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,610 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 5,060 चांदीचे दर प्रतिकिलो - 78,100 प्लॅटिनम 40,000 नागपूर शहरातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,800 10 ग्रॅम 22 कॅरेट- 58,700 10 ग्रॅम 20 कॅरेट- 55,300 10 ग्रॅम 18 कॅरेट- 50,400 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,180 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,870 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,530 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 5,040 चांदीचे दर प्रतिकिलो - 77,000 प्लॅटिनम 40,000 (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)