JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पालकांनो काळजी घ्या! डासांचा बंदोबस्त करणारे लिक्विड बेतलं चिमुरडीच्या जीवावर

पालकांनो काळजी घ्या! डासांचा बंदोबस्त करणारे लिक्विड बेतलं चिमुरडीच्या जीवावर

नागपूरमध्ये डासांचा बंदोबस्त करण्यासाठी आणलेल्या लिक्विडने दीड वर्षांच्या मुलीचा जीव घेतला आहे.

जाहिरात

लिक्विड बेतलं चिमुरडीच्या जीवावर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उदय तीमांडे, प्रतिनिधी नागपूर, 14 फेब्रुवारी : काळजाचा तुकडा असलेल्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीचं डासांपासून संरक्षण व्हावं, यासाठी वडिलांनी गुड नाईट कंपनीचं लिक्विड आणलं. मात्र, मुलगी घरात खेळत असताना तिने नकळत ते तोंडात घातल्याने अवघ्या दीड वर्ष चिमुकलीवर काळाने झडप घातली. रिद्धी चौधरी असे मृत चिमुकलीचं नाव आहे. नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील आशीर्वाद नगरमध्ये ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश चौहान यांचे मेडिकल फार्मसीचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी मृत रिद्धी बेडवर खेळत होती. खेळता खेळता तिची नजर इलेक्ट्रिक सॉकेट मधल्या गुड नाईट मशीनवर गेली. तिने रिफिल तोंडात टाकले त्यामुळे रिद्धी बेशुद्ध पडली. बराच वेळ झाला रिद्धीचा आवाज येत नसल्याने आईने जाऊन बघितले असता रिद्धी बेशुद्ध आढळली. आई वडिलांनी तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. तिथून तिला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान रिद्धिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे आई वडिलांनी घरी असलेल्या चिमुकल्यांची काळजी घेणं किती आवश्यक आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरखित झालं. वाचा - धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा घरात विविध कंपन्यांच्या डासांना मारणाऱ्या मशीन्स असतात. काही घरांमध्ये 24 तास संबंधित मशीन सुरू असते. त्यामुळे काही मुलांना इतरही त्रास होतात. या मशीनमधील लिक्विड हे लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे, असा उल्लेख देखील त्या बॉटलवर असतो.

मात्र, आता गरज आहे ते पालकांनी सुज्ञ होऊन घरातील मुलांच्या हालचालीकडे लक्ष देण्याची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या