JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर युतीबाबत बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले आम्ही..

शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर युतीबाबत बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले आम्ही..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं.

जाहिरात

शिवसेनेसोबतच्या युतीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 28 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली. या चर्चेनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजही आम्ही 164 आमदार आहोत, आणि 2024 मध्ये युती म्हणून 200 जागा निवडून आणू असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा  दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बारसू रिफायनरीवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा बारसू दौरा म्हणजे 100 चुहे खाकर बिल्ली हज को चली असा किस्सा असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पावर राजकारण करणं चुकीचं आहे. प्रकल्प काय आहे, हे जनतेला समजाऊन सांगण आवश्यक आहे. उद्धव ठाकरे गडबडले आहेत, ते दुट्टपी भूमिका घेत आहेत, कार्यकर्ते पाठवून वातावर खराब करत असल्याचा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला आहे. आज राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला राज्यात आज 147 बाजार समित्यांसाठी मतदान होत आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाजार समिती निवडणुकीत पक्षाचा राजकारण नाही, त्यामुळे कोणी आपला गड मानू नये असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या