JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News : महाराष्ट्र दिनी मिळणार मोठी भेट, 147 मेडिकल टेस्ट होणार मोफत!

Nagpur News : महाराष्ट्र दिनी मिळणार मोठी भेट, 147 मेडिकल टेस्ट होणार मोफत!

नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यात 1 मे महाराष्ट्र दिनी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही मोफत आरोग्यसेवा सुरू होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 3 एप्रिल: राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याच्या सर्व 13 तालुक्यामध्ये येत्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक डॉक्टरांसह इतर आरोग्य सेवकांच्या पदभरतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अंतिम टप्प्यात आहे. या दवाखान्यामुळे ग्रामीण आरोग्याला एक ‘बुस्टर’ मिळणार आहे. 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरु केला जाणार पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात एकूण 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह विविध प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांव्दारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात बस स्थानकाजवळ असणार आपला दवाखाना विशेष म्हणजे, हा आपला दवाखाना सध्या भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येणार असून, त्यासाठी जागा व परिसरही जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत औषधीसाठी 15 व्या वित्त आयोगाकडून 40 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय जिल्हा नियोजन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडूनही या दवाखान्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाजवळ ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे. दवाखान्यासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासाठी एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडन्ट आदींची कंत्राटीपध्दतीने भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या संदर्भात आवश्यक मनुष्यबळाची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, औषध खरेदीचीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रामीण भागात पीएचसी, उपकेंद्रापाठोपाठ आता या आपला दवाखान्यामुळे ग्रामीण आरोग्याला एकप्रकारे बुस्टर मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. थायरॉईडच्या रुग्णांसाठी मोठी बातमी, दर आठवड्यात ‘या’ दिवशी करा मोफत तपासणी, Video 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखान या योजनेअंतर्गत साधारणपणे 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखान सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, इत्यादी चाचण्या केल्या जातील.या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. आपला दवाखानात असणाऱ्या आरोग्य सुविधा कान नाक घसा तज्ज्ञ (ENT), नेत्रचिकिस्ता, स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. आपला दवाखाना अंतर्गत 147 प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शेतकरी नवरा केला तर मुलींना मिळणार बक्षीस, ‘या’ गावातील भन्नाट योजना, Video नागपूर जिल्ह्यातही मिळणार मोफत उपचार नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या क्षेत्रामध्ये जसे वाडी, कळमेश्वर, रामटेक, सावनेर आदी ठिकाणी दवाखाने सुरु होणार आहेत. येत्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून या दवाखान्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याच्या सर्व 13 तालुक्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या