JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ajit Pawar : 'मिठाचा खडा कुणी..' आघाडीतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टचं बोलले, म्हणाले..

Ajit Pawar : 'मिठाचा खडा कुणी..' आघाडीतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टचं बोलले, म्हणाले..

Ajit Pawar : महाविकास आघाडीतील जागावाटपावरुन सुरू असलेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते नागपुरात बोलत होते.

जाहिरात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 3 जून : महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीला 1 वर्ष बाकी असतानाच मित्रपक्ष एकमेकांच्या जागांवर दावा सांगत आहे. नुकतेच ठाकरे गटानं कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनेही त्याच जागांवर दावा ठोकला. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसीसेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. त्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. काय म्हणाले अजित पवार? मागील काही दिवसांच्या घडामोडींवर बोलताना अजित पवार म्हणाले, की जर कुणी काही बोलले तरी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असते. तिघांना पुढं मागे व्हावे लागेल. एकत्र लढलो तरच भाजपच्या विरोधात लढू शकतो. मिठाचा खडा कुणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही. प्रवक्ते काहीही बोलले तरी वरिष्ठ नेते एकत्रितपणे चर्चा करतात, त्यांच्यात काहीही वाद नसल्याचे अजित पवार म्हणाले. नागपूरला महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही, आम्ही एकत्र बसून चर्चा करू. पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी तेवढेच बोललो तर ज्याची ताकद जास्त त्याला झुकतं माप दिलं पाहिजे, त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जास्त जागा आहेत ते बघून जागा वाटप करण्यात यावा, असं स्पष्टीकरण पवार यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं आहे. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे : अजित पवार कालच्या रेल्वे अपघातात 300 जण मृत्युमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले आहेत. यात यापूर्वी अशा प्रकारचे अपघात झाल्यावर राजीनामे दिले होते. त्यामुळे आताच्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. मात्र, खालच्या अधिकऱ्यांची देखील चौकशी होईल. आज वंदे भारत रेल्वे सुरू केली जात आहे. प्रणाली अद्यावत होत असताना अशा प्रकारे सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला. त्यामुळं चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. वाचा - खडसे, मुंडे भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया विदर्भात आम्हाला सुरुवातीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, त्यानंतर यश कमी झालं. आमचे नेते कमी पडले. आम्ही कमी पडलो, त्यामुळं विदर्भात आम्हाला अपेक्षित यश मिळत नाही. आता दौरे वाढविले आहे, विदर्भात आम्ही विशेष लक्ष देणार आहोत, पक्षातील वरिष्ठ नेते दुर्लक्ष करतात असा आरोप करण्यात आला. मात्र, आम्ही सर्व भागात समान न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला. मात्र, जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम केलं, आम्ही निर्णय झटपट घेतले तर आणि नाही केला तर तरी आम्हाला बदनाम केलं, हे चुकीचे होते, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या