विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 21 एप्रिल : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र लढ्यात विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालत आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. त्यासाठी गांधींजीनी स्वतः हातात चरखा घेत खादीला प्रोत्साहन देण्यासाठी सुत तयार करण्यास सुरूवात केली. आज आपला देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न बाळगून आहे. याच प्रेरणेला बळ मिळावं म्हणून नागपूरच्या जयंत तांदूळकर या कलाकाराने अवघ्या 40 मिली ग्रॅमाचा चरखा तयार केला आहे. 3.20 मिमी लांबी, 2.36 मीटर रूंदी आणि 3.06 मीटर या चरख्याचा आकार आहे. या चरख्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. जगातील सर्वात लहान चरखा महालेखाकर कार्यालयात वरीष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या जयंत तांदूळकर हे कलाकार असून त्यांनी आजवर असंख्य कलाकृती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या साऱ्या कलाकृती टाकावू वस्तूपासून त्यांनी तयार केल्यात. हा चरखा तयार करण्यासाठी त्यांनी लहान काड्या, स्टीलची तार आणि कापसाचे सूत वापरले आहे.इतका लहान असूनही या चरख्यावर सूताची निर्मिती केली जाते.
आपला नौकरी पेशा सांभाळून फावल्या वेळेत त्यांनी आपला छंद जोपासला आहे. हा चरखा तयार करण्यासाठी त्यांनी लहान काड्या, स्टील तार आणि कापसाचे सूत वापरले आहे. एवढा लहान आकार असून या चरख्यावर सूत कातले जाते. हा एक पूर्णपणे कार्यरत चरखा आहे. हा अभिनव चरखा जगातील सर्वात लहान असल्याचा दावा जयंत तांदुळकर यांनी केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती आपल्या घरात दैनंदीन जीवनात वापरण्यात येणाऱ्या असंख्य टाकाऊ निरुपयोगी वस्तू आपण कचऱ्यात फेकून देत असतो. मात्र एका कलाकाराची दृष्टी असेल तर त्यातून देखील नाविन्यपूर्ण कला जन्माला येऊ शकते. मी देखील अशाच टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी अनेक घरटी,पाण्याचे भांडे तयार केली आहे. त्यात दररोज असंख्य पक्षी येत असतात. हा चरखा तयार करण्यासाठी मी लहान काड्या, स्टीलची तार आणि कापसाच्या सुताचा वापर केला आहे, अशी माहिती तांदूळकर यांनी दिली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये काय आला अनुभव? पाहा Video ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चरख्यावर सूत कातणे सुरू केले अन् स्वावलंबी भारताचा पाया घातला होता. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. यामुळे मी या लहान आकाराच्या चरख्याच्या प्रतिकृतीतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. या 40 मिलिग्राम वजनाच्या चरख्याची यापूर्वी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे. 2020 पासून या चरख्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु कोरोना काळामुळे ही प्रक्रिया मंदावली होती मात्र. नुकतेच मला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद केल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.