जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये काय आला अनुभव? पाहा Video

Beed News: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये काय आला अनुभव? पाहा Video

Beed News: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये काय आला अनुभव? पाहा Video

बीड जिल्ह्यातील 33 विद्यार्थी इस्रो सहलीसाठी गेले असून त्यांना अंतराळातील मोहिमांबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 20 एप्रिल: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध विद्यार्थी केंद्री उपक्रम राबविले जात असतात. बीड जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी इस्रो आणि नासाच्या सहलीची संधी उपलब्ध करून दिली. यासाठी जिल्हाभरातून निवडलेले 33 विद्यार्थी नुकतेच इस्रो सहलीला गेले आहेत. 17 ते 21 एप्रिल दरम्यान 5 दिवस ते इस्रोशी संबंधित विविध संस्थांना भेटी देत आहेत. भारताच्या विविध अवकाश मोहिमा, सॅटेलाईट, रॉकेट लॉन्चिंग प्रत्यक्ष पाहून विद्यार्थी भारावून गेले आहेत. 17 एप्रिलला इस्रोसाठी रवाना बीड जिल्हा परिषदेच्या शाळांतील 33 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी स्पर्धात्मक परीक्षेतून निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते आठवीतील 33 विद्यार्थी आणि आठ काळजीवाहक अधिकारी 17 एप्रिल रोजी सहलीसाठी रवाना झाले. बीड जिल्हा परिषद प्रांगणातून ते पुण्याकडे त तेथून हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बेंगलोरला गेले. या पाच दिवसीय सहलीमध्ये ते इस्रो अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांना भेटी देत आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    इस्रो सहलीत विविध संस्थांना भेटी बीड जिल्ह्यातून पहिल्यांदाच अशा आगळ्यावेगळ्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकात वाचलेले वैज्ञानिक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवयास मिळत आहेत. या सहलीत विद्यार्थ्यांनी विश्वेश्वरय्या म्युझियम, बेंगलोर, विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC), थुंबा तिरुअनंतपुरम येथील रॉकेट लॉन्चिंग, इस्रोच संग्रहालय या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट देऊन अवकाश संशोधनासंबंधी विविध बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची सुवर्ण संधी, ‘या’ पद्धतीनं करा अर्ज विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर बीड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाभरातून 33 विद्यार्थ्यांना इस्रो सहलीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये बेंगलोर येथील इस्रो अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या विभागांना प्रत्यक्ष भेट दिली. स्पेस म्युझियम, भारतीय अवकाश यानाची प्रगती, वेगवेगळ्या प्रकारचे सॅटॅलाइट, रॉकेट लॉन्चिंग या गोष्टी पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल‌, असे बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात