मुंबई, 12 जून: मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. 50-50 हा फॉर्म्युला ठरल्याचा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत तर भाजपनं पुढचा मुख्यमंत्री आमचाच अशी घोषणा आधीच सुरू केली आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी युतीच्या आणाभाका घेतलेल्या सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. पण युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केलेल्या ट्विटमुळे या चर्चेत ट्विस्ट आला आहे. नेमकं काय झालं आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.