मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट
मुंबई, 13 जून : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरी पावसाचा जोर कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या वाऱ्याचा वेग मंदावला आहे, बिपरजॉय वादळाचा जोर कमी झाल्यानंतर 17 जूनपर्यंत पाऊस कोकणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान किनारपट्टी भागात कालच्या तुलनेत समुद्रातील वाऱ्याचा जोर आज मंदावला आहे. काल खवळलेला समुद्र आज काही प्रमाणात शांत पाहायला मिळतोय. सतर्कतेचा इशारा दरम्यान हवामान खात्याकडून बिपरजॉय चक्रिवादळाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉयच्या प्रभामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे. Cyclone Biporjoy : गुजरातला जाणाऱ्या 67 रेल्वे रद्द; महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता राज्यातील पावसाचा अंदाज पुढील 2-3 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे . हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नशिक,रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, 15 जून रोजी चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.