विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी
मुंबई, 17 जुलै : आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले असून, सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी काँग्रेसकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झालं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही काँग्रेसचाकडून विरोधी पक्षनेता म्हणून कोणाचंही नाव पुढे आलेलं नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले आहेत. काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे.