JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; ठाकरे बंधू एकत्र येणार?

Maharashtra Politics : आताची सर्वात मोठी बातमी! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; ठाकरे बंधू एकत्र येणार?

Raj Thackeray And Uddhav Thackeray : अभिजीत पानसे - संजय राऊतांचा, भांडुप ते प्रभादेवी कारमधून एकत्र प्रवास केला. त्यानंतर आता या चर्चांना उधाण आलं आहे.

जाहिरात

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल पाटील प्रतिनिधी मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. त्यानंतर आता मनसे काय भूमिक घेतं याकडे जनतेचं लक्ष होतं. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणायला हवी. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसेकडून ठाकरे गटाला युतीसाठी प्रस्ताव देण्यात आल्याची मागिती समोर आली आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अभिजीत पानसे - संजय राऊतांचा, भांडुप ते प्रभादेवी कारमधून एकत्र प्रवास केला. त्यानंतर आता या चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत पानसे यांच्या भेटीनंतर संजय राऊत तातडीने मातोश्रीवर पोहोचले आहेत. अभिजीत पानसे यांनी घेऊन आलेल्या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ठाकरे बंधु एकत्र यावे बाबात दोन्ही पक्षातील नेते सकारत्मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या