JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन् शपथ पूर्ण करण्यासाठी तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन् शपथ पूर्ण करण्यासाठी तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी!

घरातील मंडळींनी देखील याबाबत त्याला रागावलं. परंतु हर्षवर्धनने निश्चय मोडला नाही. जेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा हर्षवर्धनचे स्वप्न पूर्ण झाले.

जाहिरात

Mumbai: Newly sworn-in Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray, his son and Yuva Sena Chief Aaditya Thackeray acknowledge their supporters, at Shivaji Park in Mumbai, Thursday, Nov. 28, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_28_2019_000205B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 02 डिसेंबर : जोपर्यंत शिवसेनेची सत्ता येणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी आगळीवेगळी शपथ घेतलेल्या एका शिवसैनिकाने तब्बल तीन वर्षानंतर दाढी केली आणि आपली शपथ पूर्ण केली. औरंगाबादच्या हर्षवर्धन त्रिभुवन या युवकाने ही आगळीवेगळी शपथ घेतली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्याने घेतलेला प्रण पूर्ण झाला आणि त्यांची भीष्मप्रतिज्ञा पूर्ण झाली. औरंगाबादचा हर्षवर्धन त्रिभुवन हा हाडाचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हर्षवर्धन प्रभावित आहे.  तीन वर्षांपूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होई पर्यंत पूर्ण दाढी म्हणजेच क्लीन शेव करणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने घेतली. कुठल्याही परिस्थितीत शिवसेना वाढवायची असा निश्चय त्याने केला होता. ‘पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला’ शिवसेनेचा उपविभागप्रमुख असलेला हर्षवर्धन त्रिभुवन हे एका खाजगी रुग्णालयात ऑपरेशन हेड म्हणून हे काम करतात. हर्षवर्धन लहानपणापासून शिवसेनेसोबत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने निश्चय केला होता की जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हाच क्लीन शेव (दाढी) करेल. त्यावेळी अनेकांनी हर्षवर्धन याची थट्टा केली. ‘या’ कारणांमुळे अस्वस्थ आहेत पंकजा मुंडे घरातील मंडळी देखील याबाबत रागावत होते. परंतु हर्षवर्धनने निश्चय मोडला नाही. जेव्हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा हर्षवर्धनचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे त्याने आपली शपथ पूर्ण झाल्यावर तीन वर्षांनी पूर्ण दाढी केली. उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न तर सोडवतीलच परंतु सामान्य माणसांच्या अडचणी देखील ते सोडवतील असा विश्वास या हर्षवर्धन त्रिभुवन शिवसैनिकाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या