बीड, 28 सप्टेंबर: विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध झाला की, आश्वासन, शब्द, वाचननामा, विकासाच्या घोषणा या सगळ्याना ऊत येतो. मात्र, बीडमध्ये चक्क देवाला आश्वासन.. प्रलोभन दाखवण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना भाजपचे माजलगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचे तिकीट मिळावे म्हणून त्यंच्या एका अतिउत्साही कार्यकर्त्यांनी चक्क माजलगाव मतदार संघातील देवदहिफळ येथील नवसाला पावणारे मल्हारीमार्तंड खंडेरायास अखंड महाभिषेक करून साकडं घातलं आहे. एवढेच नाही तर तिकीट मिळालं तर मंदिराचा सभामंडप बांधू, असे चक्क देवाला आश्वासन दिले आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीत देवाला नवस बोलणारांची संख्या वाढली आहे. यामुळे जत्रेच्या अगोदरच देव देवस्थानाची चांदी होते. मुख्यमंत्री आरोग्य कक्ष मार्फत महाराष्ट्रात रुग्णांच्या बाबतीत काम केलेले अधिकारी ओमप्रकाश शेटे यांचे माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी नाव पुढे येत आहे. त्यांनी तसा मतदार संघात संवाद आणि गाठी भेटीचा सपाटा लावला आहे. ओमप्रकाश शेटे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. माजलगाव मतदारसंघातील भूमीपूत्र तरुण व नवीन चेहरा असल्याने त्यांच्या उमेदवारीची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून देवदहिफळ येथील नवसाला पावणाऱ्या खंडोबा देवस्थानास अखंड महाभिषेक करत ओमप्रकाश शेटे यांच्या उमेदवारी व विजयासाठी साकडं घातलं आहे. बनाए गे मंदिर..! ओमप्रकाश शेटे यांना माजलगाव मतदार संघातून उमेदवारी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना सद्बुद्धी मिळो, यासाठी आम्ही नवसाला पावणार्या खंडेरायास महाभिषेक करून साकडं घातलं आहे, असे बंडू खांडेकर यांनी सांगितले. अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO